मा. चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली!

*मा. चंद्रकांतदादांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली!*

*राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे प्रतिपादन*

कोथरूडचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्याशिवाय पाच वर्षांत चंद्रकांतदादांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या कुटुंबांसाठी काम केलंय. त्यामुळे दादांचा नम्रपणा समोरच्याला पराभूत करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांनी व्यक्त केला.

कोथरूड मतदारसंघातील रिक्षा चालक संघटनांचा सस्नेह मेळावा संपन्न झाला.यावेळी महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पिंपरी चिंचवडचे सदाशिव खाडे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा कोथरूड सरचिटणीस गिरीश भेलके, रिक्षाचालक संघटनेचे केशव क्षीरसागर, सुनील मालुसरे यांच्या सह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिपक मानकर म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे अतिशय सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना नेहमीच साथ दिली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेता यावे; यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. सध्या विरोधकांकडे मुद्देच राहिलेले नाहीत. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांचा नम्रपणाच विरोधकांना पराभूत करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरूड हे कुटुंब मानून गेल्या पाच वर्षांत काम केलं. त्यापूर्वी कोल्हापूर मध्ये ही असंच काम करत राहिलो. समाजाची गरज पाहून कार्यक्रम करणं, उपक्रम राबविणे याला माझे नेहमीच प्राधान्य असते. महायुती सरकारने रिक्षाचालकांना महायुती सरकारने महामंडळ निर्माण केलंय. त्याचा रिक्षाचालकांना लाभ होईल, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्तीत जास्त मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

*बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण*

  *बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण* पुणे : माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या

Spread the love
Read More »