कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी अँड हॉलिडेज लिमिटेड ने ‘न्यू इयर्स बॅश – वॉर ऑफ डीजे’ आणि ‘चलो श्रीलंका’ उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा केली!
18 डिसेंबर 2024 रोजी कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी अँड हॉलिडेज लिमिटेडने त्यांच्या बहुप्रतीक्षित न्यू इयर्स बॅश ‘वॉर ऑफ डीजे’ ची घोषणा केली. याआधी, सीसीएचएचएलने शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटी तसेच कपिल देव, पी. व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंच्या उपस्थितीत मनोरंजनाचे भव्य कार्यक्रम आयोजित केले होते. यावर्षी, सीसीएचएचएल संपूर्ण भारतातील त्यांच्या क्लब आणि रिसॉर्ट्समध्ये “एशियाचा सर्वात मोठा न्यू इयर्स बॅश 2025” आयोजित करणार असून मुख्य कार्यक्रम ‘वॉर ऑफ डीजे’ पुण्यातील कंट्री क्लब उंड्री येथे होणार आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटी डान्स परफॉर्मन्स, लाईव्ह म्युझिक आणि डीजे सादरीकरण असेल.
अलीकडील काळात आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कंट्री क्लब इंडियाने ‘चलो श्रीलंका’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. भारतीय पर्यटकांना श्रीलंकेतील अद्भुत सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि जैवविविधतेचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमात ‘बडे दिलवाले कार्ड’ ची सुरुवात करण्यात आली असून कंट्री क्लब सदस्यांना श्रीलंकेच्या पर्यटन अनुभवासाठी खास लाभ मिळणार आहेत.
श्रीलंका ही नेहमीच भारतीय पर्यटकांची आवडती पर्यटन स्थळ राहिली आहे, ज्याला भारत आणि श्रीलंकेतील वाढत्या दळणवळण सुविधांनी अधिक बळ दिले आहे. प्रमुख भारतीय शहरांमधून नियमित विमानसेवा आणि नुकत्याच सुरू झालेल्या फेरी सेवेमुळे श्रीलंकेला प्रवास करणे अधिक सोपे आणि किफायतशीर झाले आहे. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत निळेशार आकाश आणि हिरव्यागार निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटनासाठी हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. कोलंबोची आकर्षक नाईटलाईफ, कँडीचे ‘टेंपल ऑफ द टूथ रिली’ आणि किटुलगला येथील साहसी सफर, यासारख्या अनुभवांसह बडे दिलवाले कार्ड सदस्यांना एक अविस्मरणीय प्रवास प्रदान करेल.
या उपक्रमाबद्दल व्यक्त करताना, कंट्री क्लब इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. राजीव रेड्डी यांनी सांगितले की, “बडे दिलवाले ही संकल्पना माझ्या स्वतःच्या श्रीलंका प्रवासातून प्रेरित आहे. कोलंबोच्या नाईटलाईफचा आनंद, कँडीमधील टेंपल ऑफ द टूथ येथे भेट, तसेच किटुलगलामध्ये व्हाईट-वॉटर राफ्टिंगचा थरार, हे अनुभव अविस्मरणीय होते. मला खात्री आहे की आमचे सदस्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या संस्मरणीय आठवणी तयार करतील. बडे दिलवाले हे हैदराबादी आदरातिथ्याचे प्रतीक असून जागतिक दर्जाचे अनुभव आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.”
श्रीलंकेतील प्रवासादरम्यान, श्री. रेड्डी यांनी श्रीलंकन क्रिकेट दिग्गज अरविंदा डि सिल्वा यांच्या सोबत वाढदिवस साजरा केला, माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली आणि भारत बायोटेकचे कृष्णा एला यांच्याशी संवाद साधला. या भेटींनी भारत आणि श्रीलंकेमधील सुसंस्कृत आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक दृढ केल्याचे सिद्ध केले.
‘चलो श्रीलंका’ या उपक्रमाद्वारे कंट्री क्लब इंडियाने जागतिक पर्यटन क्षेत्रात एक नवीन मापदंड निर्माण केला आहे. हा उपक्रम सदस्यांना खास प्रवास अनुभव देतानाच सांस्कृतिक आणि वैयक्तिक नाती जपण्याची संधी प्रदान करतो.