सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
लोकराजा, छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार समाजात रुजवण्याचं काम त्यांनी केलं. शिक्षण हेच खरं मुक्तीचं साधन आहे, या विचारातून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी क्रांतिकारी योजना राबवल्या. स्त्रीशिक्षणासाठी आग्रही छत्रपती शाहू महाराजांनी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला. जातीभेद व अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचं अमूल्य काम त्यांनी केलं. विकासाची दूरदृष्टी बाळगणारे लोककल्याणकारी राजे, छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला व स्मृतींना वंदन!
#छत्रपती_राजर्षी_शाहू_महाराज
#ChhatrapatiRajarshiShahuMaharaj