३००० शाळकरी मुलां-मुलीं सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवस्तुती पठण ‘कमळी’ ची वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया ला गवसणी !
‘कमळी’ मालिकेचं अनोखं प्रमोशन वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया ला गवसणी !
प्रेक्षकांना कायमच दर्जेदार आणि मनोरंजक कथा देणाऱ्या “झी मराठी” वर एक नवी कोरी मालिका दाखल होत आहे ‘कमळी’ . या मालिकेची कथा एका अश्या मुलीची आहे जिला माहितीये की ‘शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे’. त्यामुळेच लहानश्या खेड्यातून बाहेर पडून तिला मुंबईत यायचंय आणि सगळ्यात नावाजलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन मोठं व्हायचंय आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन तिला गावी महाविद्यालय सुरु करायचे आहे , जिथे तिच्यासारख्याच शिक्षणाची ओढ असणाऱ्या अनेक मुली शिकू शकतील.
‘कमळीच्या’ वायरल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्तुतीच्या प्रोमोची चर्चा सर्वत्र झाली आणि म्हणूनच ३००० पेक्षा जास्त मुलामुलींसोबत ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट, गोखले रोड नौपाडा ठाणे. पटांगणात शिवस्तुती गायली गेली. ही छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना होती, आणि याची वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली.
हा उपक्रम सर्वांच्या मनात खोलवर रुजला. यावेळी कमळी म्हणजेच विजया बाबर , केतकी कुलकर्णी आणि निखिल दामले यांच्या उपस्थितीने उपस्थित प्रेक्षक आणि पत्रकारांचा उत्साह वाढवला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी मालिकेबद्दल चर्चा केली आणि आजचा अनुभव शेअर केला.
तेव्हा बघायला विसरू नका ‘कमळी’ ३० जूनपासून दररोज रात्री ९ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.