एमआयटी एडीटी’त ‘आषाढ़ का एक दिन’चा प्रयोग

पुणे येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म थिएटरच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने येथील राज कपूर सभागृहात प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश लिखित दोन अंकी ‘आषाढ़ का एक दिन’ या अतिशय मनमोहक नाटकाची प्रस्तृती करण्यात आली. या नाटकाचे दिग्दर्शन राष्ट्रीय नाट्यविद्यालयाचे स्नातक तसेच अभिनेता, दिग्दर्शक व प्राध्यापक मिलिंद इनामदार यांनी केले आहे. १९५८ मोहन राकेश लिखित ‘आषाढ़ का एक दिन’ हे नाटक आधुनिक भारतीय रंगभूमि वरील पहिले नाटक मानले जाते. हे नाटक इ. पु.४ थ्या शतकातील कवि व नाटककार कालिदास व मल्लिका यांची एक प्रेम- विरह कथा आहे. नाटकाचे कथानक हे मल्लिकाच्या जीवना भोवती फिरणारे असून मल्लिकाचे कालिदास विषयी असणारे त्याग पूर्ण प्रेम, कालिदासाची  सामाजिक परिस्थिती व कालिदासाचे तपोभूमित परत येण या मुख्य घटनांवर आधारित आहे, अशी माहिती नाट्य विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अमोल देशमुख यांनी यावेळी दिली.नाटकातील दृश्य व भाषा अत्यंत संवेदनशील व प्रभावी होती, मात्र नाटकातील कलाकरांनी सर्व पात्रे आपल्या उत्तम अभिनयाने जिवंत केली. मल्लिकाच्या भूमिकेत अदिति शर्मा, कालिदास- अब्दुल रहमान, अंबिका- गौरी श्रीवास्तव, विलोम- तिलक पटेल, मातुल- अंजन अनुरंग, निक्षेप- सारंग चव्हाण, राजपुरुष- आदर्श कुमार, प्रियंगुमंजरी- कल्पान्तिका त्रिवेदी, संगीत संचलन-कादंबरी जगताप, प्रकाश परिकल्पना- अनिर्बान बनिक, वेशभूषा- किरण पावसकर यांनी आपल्या कामगिरीने उपस्थितांच्या मनावर छाप सोडली. दोन टप्प्यात झालेल्या या नाटकाला एमआयटी एडीटी विद्यापीठ तसेच पंचक्रोशीतील नागरीकांची उपस्थिती लाभली.

*विभागाला राज कपूरांची प्रेरणा*
एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस असणाऱ्या विश्वराजबागेला भूतपूर्व बॉलीवूड अभिनेता राज कपूर यांचे वास्तव्य लाभले असून त्यांच्या स्मरणार्थ २०१९ मध्ये डिपार्टमेंट थिएटरची स्थापना करण्यात आली. आजवर या विभागातून पदवी मिळविलेले बरेच विद्यार्थी हे देशभरात व देशाबाहेर रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यामुळे, यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या प्रवेश प्रक्रिये साठी तरुणाईत प्रचंड उत्साह बघायला मिळत आहेत.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार 

  पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड  सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार  पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह

Spread the love
Read More »