वाहन विमा नूतनीकरण आणि दंड वसुली प्रक्रिया संलग्न असाव्यात, राज्य शासनाकडे प्रस्ताव : मनोज पाटील यांची माहिती

वाहन विमा नूतनीकरण आणि दंड वसुली प्रक्रिया संलग्न असाव्यात राज्य शासनाकडे प्रस्ताव : मनोज पाटील यांची माहिती पुणे : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे बजाविण्यात येत असलेल्या दंडाच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. वाहनाच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना थकीत दंड वसुली होण्यासाठी या … Read more

Spread the love

फार्मसीच्या विविध क्षेत्रातील व एमपीएससी मधील यशवंताचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला

फार्मसीच्या विविध क्षेत्रातील व एमपीएससी मधील यशवंताचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला पुणे – फार्मसी समुदायाच्या यशाचा गौरव करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फार्मासिस्टचा पुण्यात भव्य महाराष्ट्र फार्मसी सन्मान सोहळा आयोजित केला.नागरी सेवा, कम्युनिटी फार्मसी, अकादमी आणि फार्मास्युटिकल उद्योगातील फार्मासिस्टना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमाने समाजात फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. हा … Read more

Spread the love

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे पिंपरी – चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत 

*लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असल्याचा संदेश देणारी ही सन्मानयात्रा – खासदार डॉ. अजित गोपछडे*  *-वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे पिंपरी – चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत*  पिंपरी-चिंचवड : वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. ही यात्रा हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे; आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक … Read more

Spread the love

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन : ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ७वा दीक्षांत समारंभ उत्साहात

*विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा* पुणेः विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, … Read more

Spread the love

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे राष्ट्रपिता म. गांधींच्या १५५ व्या जयंती निमित्त ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर रोजी होणार जागतिक परिषद

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे१० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचं विश्वराजबाग,पुणे येथे आयोजन राष्ट्रपिता म. गांधींच्या १५५ व्या जयंती निमित्त ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर  रोजी जागतिक परिषद पुणे : २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरु म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. हे स्वामी विवेकानंदांचे भाकित … Read more

Spread the love

खोटे ट्रेडमार्क वापरून केली जाते भारत सरकारची तसेच महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक असे वकतव्य जर्मी फास्ट प्रणेते श्री शिवाजी देशमुख यांचा थेट धर्यशील विनायक बावसकर यांच्यावर आरोप

कॉपीराईटची खोटी केस,  सरकारची फसवणूक, जिल्हा न्यायालय पुणे, भारत सरकारचे ट्रेड मार्क ऑफिस, कॉपीराईट ऑफिस यांची केलेली फसवणूक, बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्या डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीवरती तसेच डायरेक्टर धैर्यशील विनायक बावसकरवर व इतर डायरेक्टर्स तसेच कंपनीमधील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुणे : भारत सरकारच्या कॉपीराइट ऑफिस, दिल्लीची फसवणूक. “जर्मिनेटर” … Read more

Spread the love

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसींचा पाठिंबा हेमंत पाटील यांचे वकतव्य

विधानसभा निवडणुकीत मराठा – ओबीसी बांधवांची एकजुट दिसेल पुणे – आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील काही नेत्यांनी इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता या तथाकथित नेत्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.२५ सप्टेंबर) पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून … Read more

Spread the love

*पॅरा ऑलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस* तसेच स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला २ लाखांचे बक्षिस जाहीर

पुणे : प्रतिनिधी पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत गोळा फेक मध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या सचिन खिलारीला युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर याच स्पर्धेत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला दोन लाखांचे बक्षीस … Read more

Spread the love

* एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २० व्या बॅचचा शुभारंभ * राजकारणात ‘सेवा परमोधर्म’ हे सूत्र लक्षात ठेवा पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान यांचे उदगार

पुणे – दिः १३ सप्टेंबर: ” ‘सेवा परमोधर्म’ हे सूत्र लक्षात ठेऊन राजकारणाच्या मैदानात उतरावे. जनतेच्या सेवेतूनच सामाजिक समस्या सोडविता येतात. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल.” असे उद्गार पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’(एमपीजी) २० व्या बॅच च्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ. सी.पी.जोशी व महाराष्ट्र विधानपरिषदे च्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड होते.

तसेच एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर व श्रीधर पब्बीशेट्टी हे उपस्थित होते.

यावेळी नॅशनल लॅजिलेटिव्ह कॉन्फरन्सच्या कॉपी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुलतार सिंह संधवान म्हणाले,” समाजावर राजकारणाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. या क्षेत्रात येतांना मानव सेवा निःस्वार्थ भावनेने करावी. विचार आणि तलवाराने इतिहास लिहिला जातो. या देशात विविध धर्मांचे लोक असल्याने धर्म विरोधक गोष्टींना कधीही वाव देऊ नका. देशातील संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कायदे पास होतात त्यावर चर्चा विमर्श होत नाही. त्यामुळे असे आमदार आणि खासदार निर्माण व्हावे जे यावर बोलतील.”

डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या,” सरकार आणि प्रशासन समजावून घेणे, न्याय संस्था, शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवा, ऐकण्याची सवय ठेवावी आणि लेजिलेटीव्ह टुल्स हे गुण अंगीकारावे. त्याच प्रमाणे राजकारणात उतरल्यावर संसदीय कामकाज, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि जीवनासंदर्भातील अधिकार व आत्मविश्वास मिळतो. समाजाचे कल्याण साधण्यासाठी राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात. हा धागा सर्वांना जोडणार आहे. मानवधिकार संदर्भात माहिती घ्यावी. देशात आज ही जाती आणि वर्ण भेद आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी युवकांनी कार्य करावे. बदलत्या राजकारणामुळे खाजगी आणि सार्वजनीक जीवन राहिलेले नाही याचे भान ठेवावे.”

डॉ.सी.पी जोशी म्हणाल्या ” देशात औद्योगिक क्रांती नंतर सूचना क्रांती ही सर्वात मोठी होती. येथील उच्च शिक्षण जरी गुणवत्तापूर्ण असले तरी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणेची अपेक्षा आहे. विषम समाजाला एकत्रित आणण्यासाठी राजकारणी मंडळींचे काम आहे. त्याच नुसार प्रत्येक युवकांमधील स्कीलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाचे ज्यांनी नेतृत्व केले ते सर्व बाहेर देशातून उच्च शिक्षण घेऊन आले होते. त्यामुळे आता राजकारण क्षेत्रात योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. देशात शिक्षित युवा वोटर असल्यास शिक्षक राजकारण येतील.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे पालन करून मानव सेवेला महत्व दयावे. वसुधैव कुटुम्ब कमची संकल्पना राबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतांना पं. नेहरू यांनी सांगितले होते की मे देशाचा सेवक आहे. अशी भावना ठेऊन प्रत्येकाने कार्य करावे.”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,”राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. देशाची वाढती लोकसंख्या संदर्भात कोणतीही पार्टी विचार करीत नाही. अशा वेळेस राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची ब्यूरोक्रॉसी व स्थिती सुधरण्यास वेळ लागणार नाही. त्याच प्रमाणे देशातील कोणत्याही निवडणुकीच्या १ वर्षापूर्वी कोणतीही योजना घोषित करू नये. त्याच प्रमाणे हा पाठ्यक्रम देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेत सुरू करण्याची गरज आहे.”

यावेळी डॉ. आर.एम.चिटणीस यांनी विचार मांडले

डॉ. परिमल माया सुधाकर यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली.

यावेळी विद्यार्थी संस्कृती ढोलमा आणि ध्रुव सावजी यांनी विचार मांडले

प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

Spread the love

अभिनेत्री आदा शर्मा तसेच उपस्थित आदि मान्यवर यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली.

पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, डी सी पी झोन ३ चे श्री. संभाजी कदम, पद्मश्री पंडित विजय घाटे आणि अभिनेत्री आदा शर्मा यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. Spread the love

Spread the love