‘दलित पँथर’ चा 52 वा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात साजरा

शोषितांचा लढा उभारणाऱ्या पद्मश्री संस्थापक अध्यक्ष कालकतीत नामदेव दादा ढसाळ यांच्या दलित पॅंथर संघटनेचा 52 वा वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सौ मोनिकाताई मोहोळ यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. यावेळी दलित पॅंथरच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त 52 विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना सन्मानचिन्ह शॉल देऊन त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या संघटनेच्या वतीने जबाबदारीचे नियुक्तीपत्र ही देण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मोनिकाताई मोहोळ यावेळी बोलताना म्हणाल्या की सर्व दलित पॅंथरच्या पुणे शहरातील नागरिकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले यामुळे हे मंत्रीपद शक्य झाले परीक्षा आम्ही पास झालो. परंतु या पुढील काळात कोणालाही परीक्षा देण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही देते ! श्री परशुराम वाडेकर महाराष्ट्र प्रदेश आरपीआय सचिव यांनी उपस्थितांना संबोधित केले दलित पॅंथर चा पॅंथर म्हणून कार्याची वाटचालीस सुरुवात झाली त्याचप्रमाणे दरवर्षी यशवंत भाऊ नडगम न विसरता दलित पॅंथर मधील जुन्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देऊन त्यांचा नागरिक सत्कार करतात हे सातत्य त्यांनी आजही जपून ठेवले आहेत याची उपस्थितांना आठवण करून दिली. बाळासाहेब जानराव यांनी सांगितले की 1982 ते 2024 या काळात दलित पॅंथरच्या वतीने झोपडपट्टीला मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून लढा दिला तसेच शेतकरी अल्पभूधारक जमीन धन दांडग्यांनी बळकावलेल्या होत्या त्या दलित पॅंथरने सर्वांना न्याय मिळवून आपापल्या जमिनी परत करून दिल्या. यावेळी पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला त्याचप्रमाणे आरपीआय पुणे शहराध्यक्ष श्री संजय सोनवणे यांनी उपस्थितांना दलित पॅंथर संघटनेची सुरुवात सिद्धार्थ कॉलेज वडाळा येथून झाल्याचे सांगून नामदेव दादा ढसाळ सारख्या झाल आणि कडव्या मातब्बर नेत्याची एक आठवण करून दि होते त्याचप्रमाणे निमंत्रक म्हणून कु. सुवर्णाताई भुजंग नडगम ,संतोष गायकवाड, स्नेहा ताई माने, आकाश पायाळ, सनी पंजाबी, जाफर भाई सय्यद, हिना पानेम अविनाश मोरे ,सोमनाथ साळवे, विनोद साळवे, बाबू पवार ,सुरेश पवार, विशाल ओवाळ नितीन पाटील, अजय वंदगल, जॅक्सन पनेम, महेश ढवळे, रिचर्ड डिसूजा, अतुल घायतडके , कुणाल साठे आणि दलित पॅंथरचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व त्यांचे कुटुंब उपस्थित होते यावेळी यशवंत भाऊ नडगम यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की झाले जरी हाल या जीवाचे तरी शोषित पीडित गोरगरिबांच्या सोबत न्याय देऊन असावे लागते शेवटी आम्हाला दलित पॅंथर संघटनेत राहून प्रत्येकाचे मन जपावे लागते हे बोलून आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले. 

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले.  त्यांच्या निधनावर प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व राहुल विश्वनाथ

Spread the love
Read More »