13 जुलै बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात गुप्ते मंगल कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न
वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम गेली 30 ते 35 वर्षे साजरा केला जातो, श्रीमंत सखाराम हरी गुप्ते चांद्रसेनिय प्रभू कार्यालय ट्रस्ट पुणे या संस्थेतर्फे हा अभिवादन कार्यक्रम संपन्न केला जातो,या संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक देशपांडे हे आहेत, अशोक देशपांडे हे अखिल भारतीय भारतीय चांद्रसेनिय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्था , मुंबई या संस्थेचे विश्वस्त आहेत.
यावेळी गोष्ट इथे संपत नाही ..पन्हाळा ते पावनखिंड हा आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
सिने अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सुमारे 300 लोकांनी आपली उपस्थिती लावली होती.