ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड तर्फे सोळू येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
📍 पुणे: सोळू, दि. ३० जुलै २०२५
श्री संत मुक्ताबाई माध्यमिक शाळा सोळू येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड या कंपनीने महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ही शाळा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, आळंदीपासून केवळ ५ किमी अंतरावर असलेल्या सोळू गावात असून सध्या या शाळेत सुमारे २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलवणारे हे कार्य ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड कंपनीने पार पाडले.
या कार्यक्रमासाठी कंपनीचे श्री. रोहित मोर (डायरेक्टर), श्री. संजय ताम्हणकर (चीफ ऑपरेशन ऑफिसर) व श्री. राजेंद्र कांबळे (वरिष्ठ सरव्यवस्थापक) उपस्थित होते. या उपक्रमासाठी कंपनी आणि शाळा यांच्यातील समन्वय गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद ठाकूर यांनी साधला. त्यांच्या पुढाकारामुळेच ही मदत शक्य झाली.
कार्यक्रमाला मा. सरपंच विठ्ठल ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे संचालक बाबासाहेब ठाकूर, मा. अतुल ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य गणेश गोडसे, कंपनीचे कर्मचारी आणि शाळेचे माजी विद्यार्थी ईश्वर गायकवाड, गजानन शेळके, विठ्ठल बाबर, निरंजन नायक व कोमल खलाटे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समाजोपयोगी कार्याबद्दल शाळेच्या वतीने कंपनीच्या सर्व अधिकारी वर्गाचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना श्री. संजय ताम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून आपल्या पालकांचे, गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. श्री. राजेंद्र कांबळे यांनी यापुढील काळात देखील अशा प्रकारचे सहकार्य सुरू राहील अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक श्री. रविंद्र मोरे सरांनी केले, सूत्रसंचालन श्री. शिवाजी नवले यांनी तर आभार प्रदर्शन मा. सरपंच श्री. विठ्ठल ठाकूर यांनी शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने केले.
📝 बातमी v जाहिरातीसाठी संपर्क
PUNE 24 NEWS -JAYSHREE DIMBLE
9623968990 / 9689934162
Pls Like, Comments Share, Subscribe My Channel
🙏 Thank you