३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ही स्पर्धा यंदा १०वे वर्ष साजरे करीत असून १८ ते २५ वयोगटातील मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेसाठी २० तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड

*मिस पुणे फेस्टिव्हल* स्पर्धेसाठी

२० तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ही स्पर्धा यंदा १०वे वर्ष साजरे करीत असून १८ ते २५ वयोगटातील १५०हुन अधिक तरूणींनी या व्यक्तिमत्व व गुण स्पर्धेत सहभाग घेतला. त्याची प्राथमिक फेरी नुकतीच एन.आय.इ.एम. फरग्युसन रोड येथे पार पडली.

सिनेमाटोग्राफर अमेय अवधानी, अभिनेत्री व मॉडेल साक्षी पाटील, शो डायरेक्टर व ग्रुमिंग मेंटॉर जुई सुहास यांनी अतिम फेरीसाठी २० युवतींची निवड केली. या २० जणींना प्रशिक्षण दिले जात असून, सौंदर्य, सर्वसाधारण ज्ञान, कुटुंब व समाजाबद्दलच्या भावना, त्या बरोबरच त्वचा, केस व दंत चिकीत्सा, फोटोजनिक चेहरा व नृत्य या आधारे अंतिम फेरी सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायं ६:०० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमच येथे संपन्न होईल, ज्येष्ठ गायिका व बँकर अमृता फडणविस यांच्या हस्ते मुगुट परिधान केला जाईल. 

डावीकडून मिस पुणे फेस्टिवल 2024चे स्पर्धक 1. अंशिका तामखाने 2. अर्पिता सोनपत्की 3. अस्मिता साहू 4. भाग्यश्री बोबडे 5. धनश्री गडगे 6. गौरी मोहोड 7. मेहेक सिंग 8. मृणाल भोयर 9. नक्षत्रा चौधरी 10. प्रज्ञा भारद्वाज 11. श्रेया सिंग 12. श्रुती थोरात 13. सुहानी नानगुडे 14. सुश्मिता जाधव 15. सुश्रीता घायताडके 16. उर्वी पाध्ये 17. वैष्णवी कड. फोटोत मध्यभागी जुई सुहास व सुप्रिया ताम्हाणे

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार 

  पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड  सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार  पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह

Spread the love
Read More »