दादांचा कटाक्ष, लोकसहभागातूनच त्यांनी १८ कोटी लिटर पाणी बाणेरसाठी उपलब्ध करून दिले.

 

वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरात उंचच उंच इमारती उभ्या राहतात. पण या इमारतीत राहणाऱ्यांना हळू-हळू कमी पडू लागतं जीवन, म्हणजेच पाणी… पुण्यातही अनेक ठिकाणी तसेच झाले. रोजगाराच्या संधींमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येऊ लागले, स्थिरावू लागले. पण पाणी तितकेच राहिले. आणि वाढत्या उपनगरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली.

अन्य उपनगरांप्रमाणे कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी हा भागही झपाट्याने विकसित झाला. पण या भागातही समस्या सतावू लागली, मुबलक पाण्याची. वाढत्या वस्तीमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला होता. रहिवासी त्रस्त झाले होते. महानगरपालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत या भागासाठी टाकी मंजूर झाली होती, पण काम पुढे सरकत नव्हते. त्यामुळेच बाणेर बालेवाडी भागातील रहिवासी आणखी अडचणीत आले होते.

हा विषय चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या कामाला गती दिली. विकासकामात लोकसहभाग असावा. हा दादांचा कटाक्ष असतो. लोकसहभागातूनच त्यांनी १८ कोटी लिटर पाणी बाणेरसाठी उपलब्ध करून दिले. २०२३च्या मे महिन्यात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आणि ब

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

*बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण*

  *बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण* पुणे : माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या

Spread the love
Read More »