बोपोडीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करणार – मनिष आनंद

 

*बोपोडीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करणार – मनिष आनंद*

पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आनंद यांच्या प्रचारार्थ बोपोडी गावठाण भागात मंगळवारी सायंकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामान्य मतदारांशी संवाद साधताना मनिष आनंद यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या. 

याप्रसंगी बोलताना मनिष आनंद म्हणाले, बोपोडी भागातील झोपडपट्टी, वस्ती विभागात मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करू तसेच जी मुले, मुली एमपीएससी, युपीएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छित आहेत अशा मुलांसाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करण्यात येईल, राज्य सरकारच्या माध्यमातून ही लायब्ररी उभी करण्यात येईल आणि याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य घेता येईल असे त्यांनी सांगितले. 

बोपोडी मध्ये असलेल्या झोपडपटयांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे.या परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी राज्य सरकारकडे पुणे महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करू असे आनंद यांनी यावेळी नागरिकांना सांगितले. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास आपला प्राधान्यक्रम आहे असेही त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, बुधवारी सकाळी खैरेवाडी, चाफेकर नगर, आनंद यशोदा या भागात मनिष आनंद यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार 

  पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड  सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार  पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह

Spread the love
Read More »