पुणे शहरातील विकासकामे, नागरिकांची दैनंदिन कामे तातडीने होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष‌‌ दीपक मानकर यांनी घेतली पुणे मनपा आयुक्तांची भेट

 

पुणे शहरातील विकासकामे, नागरिकांची दैनंदिन कामे तातडीने होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष‌‌ दीपक मानकर यांनी घेतली पुणे मनपा आयुक्तांची भेट

शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे शहरातील विकासकामे किंवा प्रभागातील मूलभूत कामे ठप्प झाली होती. ती लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावीत.

त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन, विद्युत खांब बसविणे, ड्रेनेज, पाणी पुरवठा, विविध रस्ते, वाहतुकीचे प्रश्न यांसह विविध प्रमुख विभागामध्ये असलेली नागरिकांची दैनंदिन कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मा.आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे संबधित विभाग प्रमुखांना निर्देश दिले. सदरप्रसंगी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर, मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे,राहुल कांबळे , पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 

श्री. दीपक माधवराव मानकर

अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

14 वा GERA पुणे रेसिडेन्शियल रियल्टी अहवाल 2024 च्या उत्तरार्धात पुण्याच्या बाजारातील बदलत्या गतीशीलतेचे प्रतिबिंब!

  14 वा GERA पुणे रेसिडेन्शियल रियल्टी अहवाल 2024 च्या उत्तरार्धात पुण्याच्या बाजारातील बदलत्या गतीशीलतेचे प्रतिबिंब! मुद्दे : • लक्झरी सेगमेंटमध्ये वाढ: लक्झरी सेगमेंटमधील नवीन

Spread the love
Read More »