ऑल इंडिया सुफी तेहरिक ए सिराते मुस्तकीम संघटनेतर्फे हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहमतुल्लाह अलैह) यांच्या 813 व्या जयंतीनिमित्त हजरत डॉ.शाह जाकीर हामीद(कादरी चिश्ती , इफ्तेकारी, हामेदी ) यांच्या हजरत जश्णे गरीब नवाज या सर्व धर्मसमभावावर आधारित प्रवचनाचे आयोजन पुण्यातील कोंढवा खुर्द येथे उत्साहात संपन्न*
पुणे -ऑल इंडिया सुफी तेहरिक ए सिराते मुस्तकीम संघटनेतर्फे हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहमतुल्लाह अलैह)यांच्या 813 व्या जयंतीनिमित्त हजरत जश्णे गरीब नवाज या कार्यक्रमात डॉ.
शाह जाकीर हामीद (कादरी चिश्ती , इफ्तेकारी, हामेदी )यांच्या धर्मसमभावावर आधारित प्रवचनाचे आयोजन पुण्यातील कोंढवा खुर्द येथील संडे बाजार येथील अक्सा मस्जिद शेजारी करण्यात आले होते. दरवर्षी सर्व महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी सर्व राज्यांमध्ये अशा प्रकारचे एकसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांचा उद्देश सुफी परंपरेबाबत मार्गदर्शन , राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म व समुदायाविषयी शांती व प्रेमाचा संदेश पसरविणे, मुस्लिम व गैर मुस्लिम समुदायाच्या मध्ये प्रेम व आदर भाव निर्माण करणे आहे.
तसेच सर्वधर्मसमभाव याबद्दल मानवी आचरणामध्ये स्वतःच्या जीवनात कसे आणू शकतात याची शिकवण म्हणजे तालीमात देण्यात येते. गरीब व पीडितांसाठी मदत करणे व त्यांच्या समस्यांचे समाधान मिळविणे गरजू व्यक्तींची मानवतेची भावना जिवंत ठेवणे. लोकांमध्ये अध्यात्मिक भावना व अल्लाहच्या विषयी प्रेमाची भावना निर्माण करणे. तसेच सामाजिक समस्यांचे समाधान व लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे, प्राण्यांची सेवा व मनुष्याचे दुःख दूर करणे.
प्रेम सर्वांसाठी व कोणाचाही तिरस्कार नाही प्रत्येक मनुष्या बरोबर प्रेम व सन्मानाचा व्यवहार करणे .ऑल इंडिया सुफी तेहरिक ए सिराते मुस्तकीम संघटनेचा मुख्य उद्देश मानवासाठी आध्यात्मिक व सामाजिक मंच प्रदान करणे जिथे प्रेम सन्मान व न्यायाचा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हा आहे.हजरत ख्वाजा गरीब नवाज 813 वर्षांपूर्वी होऊन गेलेले मुस्लिम समाजातील सुन्नी पंथातील सुफी संत असून त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.हजरत ख्वाजा गरीब नवाज(रहमतुल्लाह अलैह) यांनी अनेक गरीब व गरजू लोकांसाठी मार्गदर्शनाचे काम करून त्यांचे विचारांनी प्रबोधन केले. तसेच सर्व समाजाला एकतेचा संदेश दिला. सध्या मुस्लिम समाजाला त्यांच्या विचारांची गरज आहे असेही डॉ.शाह जाकीर हामीद यांनी प्रवचनामध्ये मत व्यक्त केले.
ऑल इंडिया सुफी तेहरिक ए सिराते मुस्तकीम संघटनेचे हे बऱ्याच वर्षांपासून आयोजन करत असून आगामी काळातही अशा प्रकारचे मुस्लिम समाजामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे संघटनेतर्फे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास पुण्यातील कोंढवा भागातील मुस्लिम समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.