जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, धानोरे येथे “ग्रावर अँड वाईल (इंडिया) लिमिटेड” यांच्या सहकार्याने डॉ. विजय भटकर संगणक कक्षाचे भव्य उद्घाटन

📍 स्थान: धानोरे, पुणे

📅 दिनांक: ३० जुलै २०२५

डॉ. विजय भटकर संगणक कक्षाचे उद्घाटन

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, धानोरे येथे “ग्रावर अँड वाईल (इंडिया) लिमिटेड” यांच्या सहकार्याने डॉ. विजय भटकर संगणक कक्षाचे भव्य उद्घाटन आज दिनांक ३० जुलै २०२५ रोजी संपन्न झाले.

या संगणक कक्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक व तांत्रिक विकासासाठी ४० अद्ययावत संगणक, तसेच एशियन पेंट्स लिमिटेड, धानोरे यांच्यावतीने फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले. संगणक कक्षाची संपूर्ण LAN वायरिंग सुयोग इंजिनिअरिंग, धानोरे यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर:

या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रोहित मोर, डायरेक्टर, ग्रावर अँड वाईल (इंडिया) लिमिटेड यांनी संगणक कक्षाचे उद्घाटन केले.

त्यांच्यासोबत खालील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली:

मा. श्री. रंजीत घोरपडे, व्हाईस प्रेसिडेंट, एशियन पेंट्स लि.

श्री. राजेंद्र कांबळे, वरिष्ठ सरव्यवस्थापक, ग्रावर अँड वाईल

मा. श्री. राजाराम वाबळे, प्रा. सुयोग इंजिनिअरिंग

मा. श्री. हृषीकेश गिरमे, HR मॅनेजर, एशियन पेंट्स

मा. श्री. अविनाश सुकळकर, सिनिअर मॅनेजर, एशियन पेंट्स

मा. सौ. सुनिता ताई गावडे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

श्री. पांडुरंग गावडे, प्रतिनिधी, एशियन पेंट्स कामगार युनियन

श्री. ईश्वर गायकवाड, श्री. गजानन शेळके, श्री. विठ्ठल बाबर, श्री. निरंजन नायक, सौ. कोमल खलाटे आदींची उपस्थिती लाभली.

CSR उपक्रमांतर्गत शैक्षणिक किट वाटप

ग्रावर अँड वाईल (इंडिया) लिमिटेड यांच्या CSR उपक्रमांतर्गत शाळेतील ६०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट (स्कूल बॅग, पाण्याची बाटली व इतर साहित्य) वितरित करण्यात आले.

प्रेरणादायी मार्गदर्शन

मा. श्री. रोहित मोर यांनी विद्यार्थ्यांना संगणक कक्षाचा उपयोग तांत्रिक कौशल्य व शैक्षणिक प्रगतीसाठी करावा, असे सांगून डिजिटल शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.

श्री. राजेंद्र कांबळे यांनी कंपनीच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व परिसरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे संकेत दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पांडुरंग आव्हाड सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. मुकुंद गावडे यांनी मानले.

हा उद्घाटन सोहळा शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला..

बातमी v जाहिरातीसाठी संपर्क :

PUNE 24 NEWS – JAYSHREE DIMBLE 

9623968990/9689934162

Pls LIKE COMMENTS SHARE SUBSCRIBE My Channel AND Web Portal Also

🙏 Thank you

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment