ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड तर्फे सोळू गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
CSR उपक्रमांतर्गत ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात
सोळू (ता. खेड, जि. पुणे) | ३० जुलै २०२५
ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड या नामांकित कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत एक स्तुत्य उपक्रम हाती घेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोळू येथील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
या उपक्रमात कंपनीचे डायरेक्टर श्री. रोहित मोर, सीओओ श्री. संजय ताम्हणकर, तसेच वरिष्ठ व्यवस्थापक श्री. राजेंद्र कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद ठाकूर यांनी या उपक्रमासाठी महत्त्वाची समन्वयक भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री. रविंद्र मोरे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या मनात प्रेरणा जागवली.
श्री. संजय ताम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला, तर श्री. राजेंद्र कांबळे यांनी भविष्यातही अशाच प्रकारे शाळेला व विद्यार्थ्यांना सहकार्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमाला ग्रामस्थांची देखील उत्स्फूर्त साथ मिळाली. सरपंच मा. विठ्ठल ठाकूर, मा. बाबासाहेब ठाकूर, मा. अतुल ठाकूर, श्री. गणेश गोडसे, तसेच कंपनीचे CSR सदस्य आणि या शाळेचे माजी विद्यार्थी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन श्री. शिवाजी नवले यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी सरपंच बाबासाहेब ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
समाजासाठी प्रेरणादायी पाऊल
ग्रावर अँड वाइल (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मोठा आधार मिळाला आहे. अशा प्रकारच्या CSR उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीस चालना मिळते आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.