काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षन्मुखानंद सभागृह येथे आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक व्हिडिओ क्लिप दाखवून त्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते
सदर व्हिडिओ क्लिप मध्ये देवेंद्र फडणवीस असे बोलताना आढळत आहे की, मोदीजींनी कोविडची लस तयार केली, सदर क्लिप ऐकून सभागृहात प्रचंड हशा पिकला होता. यावर उद्धव ठाकरे असे म्हणाले होते की, मोदींनी कोविडची लस तयार केली असे असेल तर बाकीचे काय गवत उपटत होते काय
यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांना अर्धवटराव असे संबोधले, परंतु आज पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांना सदर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे असे म्हणाले की अर्धवटराव असे कोण म्हणाले ,ही पात्र कोणाची आहेत तर ही पात्र रामदास पाध्ये यांची आहेत, मी जर अर्धवटराव असेल तर हे काय दिल्ली श्वरांची आवडाबाई आहेत काय ?
आता हे वाक् यूध्द कोठे जाऊन थांबते हीच राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा आहे.