अंतर्गत बंडाळीचा भाजपला बसू शकतो फटका ?


यंदाची लढाई इतकी सोपी नाही आपल्याला वाटत असेल परंतु यंदाच्या लोकसभा मतदानामध्ये कमालीची फेरबदल बघायला मिळणार आहे त्यातल्या त्यात काही मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीची लढाई होणार आहे त्यातीलच एक भाग म्हणून पुणे ची लढाई ही अगदीच अटीतटीची लढाई होणार आहे गेल्या लोकसभा इलेक्शन मध्ये भाजपाला दमदार विजय मिळाला होता परंतु भाजपा समोर रवींद्र धंगेकर नावाचे एक वादळ उभे आहे ज्या वादळाने विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपली कमालीची ताकद दाखवून दिली होती व ते इलेक्शन स्वतः मतदारांनी सुद्धा हातात घेतले होते .त्याच पद्धतीने आगामी पुण्याचे लोकसभा इलेक्शन सुद्धा मतदारांनीच हातात घेतले आहे मुरलीधर मोहोळ यांचा विजय अगदी सोपा वाटत आहे कारण त्यांच्या रॅलीला सभेला होणारी गर्दी परंतु या गर्दीचे मतदानात रूपांतर होईल की नाही याची शक्यता नाही भाजपाचा पारंपारिक मतदार याला गृहीत धरून चालणार नाही कारण भाजपाचा पारंपारिक उमेदवार मतदार सुद्धा कमालीचा नाराज आहे त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांना अंतर्गत असलेला विरोध हा दिसून येत नाही परंतु या दोन दिवसांमध्ये काही फेर बदल झाल्यास आश्चर्य मानू नये मतदारांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी चांगलीच ओळख निर्माण केले आहे व या ओळखीने मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर एक आव्हान उभे केले आहे रवींद्र धंगेकर यांच्याबरोबर किती कार्यकर्त्यांची फौज आहे हे महत्त्वाचे नाही पक्षाची किती ताकद उभी आहे हे महत्त्वाचं नाही तर महत्त्वाचं दिसत आहे ते म्हणजे मतदारांच्या तोंडामध्ये त्यांचं वैयक्तिक नाव जे मोहोळ यांच्या बाबतीत दिसत नाही मोहोळ यांच्या मागे भाजपा असे लावले जाते परंतु वैयक्तिक मतदारांच्या तोंडामध्ये त्यांचे नाव नाही त्यामुळे येत्या दोन दिवसात फेरबदल झाल्यास अगदी आश्चर्य म्हणू नये कारण यंदाचे इलेक्शन हे कोणत्या पक्षाचे नसून मतदारांनी हातात घेतलेले आहे असे प्रामुख्याने दिसत आहे, ब्राह्मण समाज हा बीजेपी च्या पाठीशी ताकतीने उभा आहे असा समज केला जातो परंतु हा ब्राह्मण समाज सुद्धा सुज्ञ आहे हे ब्राह्मण समाज दाखवून देईल या इलेक्शन मध्ये समाज हा पक्षाचा मागे जितका ताकतीने उभा आहे तितकाच तो चुकीच्या गोष्टींना समर्थनही देत नाही असे काही मतदारांकडून वारंवार सांगण्यात आले आहे त्यामुळे या समाजातील सुद्धा अनेक मतदार हे प्रामुख्याने धंगेकर यांच्याकडे कललेले दिसतात त्यामुळे यंदाची ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार हे मात्र ठरलेलेच परंतु मतदार राजांनी घरामध्ये न बसता आपला मतदानाचा अधिकार पार पाडावा

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

Injection OR Surjari से बेहेतर ईलाज आयुर्वेद

  *केळी* 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

Spread the love
Read More »