विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली,एकूणच हि निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली असती परंतु उद्धव ठाकरे यांनी आपला बारावा उमेदवार रिंगणात उतरवून खरी रंगत आणली व प्रतिष्ठेच्या लढाईत आपला शिलेदार मिलिंद नार्वेकर यांना विजय मिळवून दिला अर्थात नार्वेकर यांच्या सर्व पक्षीय संबंध काही लपून नव्हते
एकूणच २३ मतांची विजयासाठी गरज असताना आपलीच मतांची बेरीज बरोबर आहे हे प्रत्येक पक्षाला वाटत असताना महाविकास आघाडीला मात देत महायुतीने आपली एक हि जागेला धक्का लागू न देता आपलें सगळे ९ उमेदवार निवडून आणले.उघडपणे महाविकास आघाडीची मते फुटुन महायुतीच्या पारड्यात पडली कांग्रेस चे आमदार फुटले अशी उघड चर्चा रंगली आता ह्या आमदारावर कडक कारवाईचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.या निवडणुकीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला त्यांना अवघे १२ मते मिळत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.पैशाचा घोड़े बाजार झालाय आणि नेमका आस्तीन का साप कोण हेच शोधून कड़क कारवाई व्हावे असे मत जीतेन्द्र अव्हाड यांनी व्यक्त केले
अजित पवार यांनी काँग्रेस चे ५ मते फोडले अशीच चर्चा उघड रंगली
विधानपरिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार
मिलिंद नार्वेकर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पंकजा मुंडे – भाजपा
परिणय फुके – भाजपा
अमित गोरखे – भाजपा
योगेश टिळेकर – भाजपा
शिवाजीराव गर्जे -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
प्रज्ञा सातव -काँग्रेस
भावना गवळी – शिवसेना एकनाथ शिंदे
कृपाल तुमाणे – शिवसेना एकनाथ शिंदे
विधानपरिषद निवडणुकीतील पराभवी उमेदवार
जयंत पाटील – शेतकरी कामगार पक्ष