*लाड-पागे समिती व अनुंकपा धोरणानुसार ४० वारसांना महापालिकेत मिळाली नोकरी…*
*आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याहस्ते ४० नियुक्ती पत्रे प्रदान….*
पिंपरी, ९ जुलै २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा वारस नियुक्ती नुसार ४० जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत,महानगरपालिकामधील सफाई आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखाद्या सफाई किंवा ड वर्गातील कर्मचाऱ्यांने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास, वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्याच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १, लिपिक ७, शिपाई ९ , मजूर ४ , गटरकुली १ आणि सफाई कामगार म्हणून १८ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच अनुकंपा धोरणानुसार लिपिक पदावर ५ जणांना, शिपाई पदावर ५ जणांना व सफाई कामगार म्हणून ४ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, असे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.
जनता संपर्क अधिकारी
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:
PUNE24 NEWS – JAYSHREE DIMBLE
9623968999 / 9689934162