आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केला आहे ,एकनाथ शिंदे मौलवी च्या वेशात दिल्लीला जात होते ,धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य वगैरे काही नाही दाढीचा फायदा घेत अनेकदा ते दिल्लीला अमित शहा यांना मौलवी च्या वेशात भेटत होते अशी जहरी टीका राऊत यांनी केली
गेल्या काही वर्षात ज्या घडामोडी घडल्या राजकीय सत्तेच्या हव्यासापोटी जो काही नंगा नाच चालला आहे यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले
दरम्यान अजित पवार हे हि वेष पलटुन व नाव बदलून दिल्ली येथे जाऊन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना भेटत होते, असे नाव बदलून जाणे व विमानतळावर त्यांना कोणीही रोखत नाही हे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली यांची चौकशी होणे गरजेचे आहे ।या सगळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला