एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे राष्ट्रपिता म. गांधींच्या १५५ व्या जयंती निमित्त ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर रोजी होणार जागतिक परिषद

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे१० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचं विश्वराजबाग,पुणे येथे आयोजन राष्ट्रपिता म. गांधींच्या १५५ व्या जयंती निमित्त ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर  रोजी जागतिक परिषद

पुणे : २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरु म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. हे स्वामी विवेकानंदांचे भाकित सत्यात उतरविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर या दरम्यान विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या सम्मेलनचा उद्घाटन समारोह गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० या  वेळी होणार आहे. या प्रसंगी पद्मविभूषण डॉ. करणसिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे उपस्थित राहणार आहेत. 

 तसेच समारोप ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वा. होणार आहे. यावेळी केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ महोम्मद खान हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व सम्मेलनाचे मुख्य समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, दुरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा व डॉ.संजय उपाध्ये उपस्थित होते. 

 या परिषदेमध्ये ११ विषयांवरील ज्ञानाधिष्ठित सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये १ राष्ट्रांच्या प्रमुखांची भूमिका – संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी “शांतता संस्कृती” ला प्रोत्साहन देण्यासाठी जगात पसरलेली अराजकता, गोंधळ, रक्तपात, दहशतवाद, नरसंहार आणि भीषण हिंसा कमी करण्यासाठी राजकीय नेते

२.धर्माची संकल्पना आणि भूमिका – जागतिक धर्मांचे सर्वात आदरणीय आणि आदरणीय प्रमुखांचा “दैवी आशीर्वाद समारंभ”.

३: जागतिक शांतीसाठी विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्यात एकवाक्यता प्रस्थापित करण्याची गरज आहे.

४: सार्वभौमिक शब्दः ओम, योग, विपश्यना, नमाज, प्रार्थना आणि ध्यान इत्यादि हे जगातील शांततेची संस्कृती साकारण्याचे  दैवी मार्ग आहेत.

५: विद्यापीठे / महाविद्यालयांच्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये विज्ञान आणि अध्यात्माच्या योग्य घटकांसह “मूल्याधिष्ठीत वैश्विक शिक्षण प्रणाली” ला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

६: परमसत्य- सर्वशक्तिमान देव समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी चेतना आणि वास्तवाच्या शाळा स्थापन करण्याची गरज आहे. 

७: जगातील तीर्थ क्षेत्रांना दैवी ज्ञानाच्या केंद्रांमध्ये बदलण्याची गरज आहे किंवा जागतिक शांतता वाढवण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म / धर्म यांची भूमिका आहे. 

८.ग्लोबल वार्मिंग कमी करणे आणि मानवी अस्तित्वासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे पुन्हा परिभाषित करणे आवश्यक आहे.

९: संयुक्त राष्ट्रसंघ, युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांना संपूर्ण नियंत्रण आणि थेट हस्तक्षेपासाठी सक्षम करण्याची नितांत गरज आहे. जेणे करून अराजकता, गोंधळ, रक्तपात, नरसंहार, दहशतवाद आणि राष्ट्रांमधील युद्धे/ संघर्ष आणि इतर क्षुल्लक समस्या टाळता व थांबवता येईल. 

१०: जीनोम ते ओम

११: शांततेची संस्कृती प्रस्थापित करण्यात माध्यमांची भूमिका 

आदि विषयांचा समावेश आहे. 

झोराष्ट्रियन धर्माचे संस्थापक प्रेषित झरतुष्ट्र व चिनी प्रवासी ह्यूएन त्सांग यांच्या पुतळ्यांची स्थापना

जागतिक परिषदेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २ अ‍ॅाक्टोबरला झोरास्ट्रियन धर्माचे संस्थापक प्रेषित झरतुष्ट्र आणि सातव्या शतकात भारतात येऊन भारताची ओळख जगासमोर मांडणारा चिनी प्रवासी ह्यूएन त्सांग ह्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची स्थापना जगातील सर्वात विशाल अशा तत्त्वज्ञ संत श्री. ज्ञानेश्वर-श्री तुकाराम महाराज विश्वशांती सभागृहात करण्यात येणार आहे. या प्रसंगी भारतातील पारशी समाजातील मान्यवर व्यक्ति, तसेच दिल्ली येथील चिनी दूतावासातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

 

 

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार 

  पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड  सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार  पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह

Spread the love
Read More »