🚩शिवछत्रपती नगरला आनंद हवा🚩
पुणे : शिवाजी नगर मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मनीष आनंद बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केले. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले व त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाकडून त्यांना हॉकी स्टिक व बॉल असे चिन्ह मिळाले आहे.
तसेच मनीष आनंद हे निवडून आल्यानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील राजकीय चित्र बदलण्याचा प्रयत्न करून तेथील ज्या काही कामातील उनिवासतील त्या भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असे देखील त्यांनी मनोगत व्यक्त केले.
मनीषा आनंद म्हणाले शिवाजीनगर विधानसभेमध्ये मला नागरिकांची मोठ्या प्रमाणात साथ आहे व त्यांच्या सहयोगाने मी प्रचंड बहुमताने निवडून येणारच v निवडून येताच पहिल्यांदा मी शिवाजीनगर चे नाव खोडून छत्रपती शिवाजीनगर असे नामकरण करणार तसेच त्यांना खेळामध्ये देखील प्रचंड रुची असल्याने शिवाजीनगर याच एरियामध्ये एक इंटरनॅशनल स्टेडियम उभारण्याचा ही त्यांचा मानस आहे.
मनीष आनंद यांनी नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरूनच बंडखोरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यांना पूर्ण खात्री आहे की त्यांचे सहकारी व शिवाजीनगर विधानसभेतील नागरिक त्यांना प्रचंड बहुमत देऊन विजयी करणार. मनीष आनंद यांना प्रचंड बहुमताने विजयी करून देण्यासाठी त्यांच्या हॉकी स्टिक v बॉल या चिन्हावर मतदान करून नागरिक त्यांना बहुमत देणार असा ठाम विश्वास मनीष आनंद यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना वारंवार सांगितले