*हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक*
चंद्रकांतदादा पाटील म्हणजे सामान्य माणसांत रमणारे असामान्य नेतृत्व. हिंदू संस्कृती, तसेच सण समारंभांवर निस्सीम प्रेम करणारा निरलस हिंदुत्ववादी. पाच वर्षात चंद्रकांतदादांनी कोथरूडमधील सांस्कृतिक चळवळीला खऱ्या अर्थाने बळ दिले. कोथरूडच्या सांस्कृतिक वर्तुळात नवचैतन्य आणले.
गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव, दिवाळी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक सण. पुण्यात गणेशोत्सवाचा बाजच निराळा. चंद्रकांतदादांनी या सर्व सणांनिमित्त विविध उपक्रमांना पाठबळ दिले आणि लोकसहभागातून हे सण कोथरूडमध्ये दणक्यात साजरे करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त सहभागही दादांच्या उपक्रमांचे वैशिष्ट्य ठरले.
कोथरूडमधील भगिनींसाठी मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन चंद्रकांतदादांच्या वतीने करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोथरूडमधील माता-भगिनींसाठी गौरी सजावट स्पर्धाही घेण्यात आली. गौराईला सजवण्यासाठी भरजरी साडीची व्यवस्थाही दादांकडून करण्यात आली. विविध सोसायट्यांमध्ये घेण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम बहारदार होते. पण, या सर्व उपक्रमांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.
आज या साऱ्या महिला दादांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. कोथरूडमध्ये किमान लाखभर मताधिक्य घेऊन दादा निवडून येतील, असा अंदाज आहे, तो महिलाशक्तीच्या पाठबळामुळेच.
—-