याचे उत्तर स्वतः दीपक मानकर यांनी वृत्त वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे
दादांनी काही जरी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मला काही दिलं नाही तरी मी दादांशी प्रामाणिक आहे आणि दादांचा विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आज शरद पवार गटामध्ये प्रवेश झालेला आहे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित पवार पक्षातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शहराध्यक्ष हे शरद पवार गटामध्ये गेले आहे पुण्यातील शहराध्यक्षांच्या मनात नेमकं काय आहे ते पण असाच काहीतरी राजकीय निर्णय घेण्याच्या विचारात आहेत का ?
अजित गव्हाणे यांनी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केलेला आहे
परंतु त्याच्या पाठीमागचं कारण देखील आपण या निमित्ताने जाणून घेतलं पाहिजे मला अजित गव्हाणे मध्यंतरी भेटले होते त्यांनी मला असं सांगितलं की बाबा महेश लांडगे आमदार त्या ठिकाणी आहेत त्या मतदारसंघांमध्ये आम्हाला जर लढायचं झालं विधानसभा तर आम्हाला संधी मिळू शकणार नाही कारण की आता महायुती आणि या महायुतीच्या कालावधीमध्ये महायुतीमध्येच महेश लांडगे असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळणं अवघड आहे म्हणून आम्ही पवार साहेबांकडे जातोय आणि आम्ही 15-16 जण त्या ठिकाणी जातोय तेव्हा त्याला म्हटलं निर्णय घेताना नीट विचारपूर्वक तुम्ही घेतला
पाहिजे तर त्यांनी सांगितलं की साधारण 60-70 हजार मुस्लिम समाजाचे नागरिक त्या परिसरामध्ये मतदार राहतात आणि महायुतीमुळे ते मतदार आता पूर्णपणे डिव्हाइड झालेला आहे त्यामुळे तो आमच्याबरोबर येईल की नाही ही शंका आहे म्हणून आम्हाला विधानसभेला महेश लांडगेच्या अगेन्स उभं राहायचं या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रवेश करतोय असं त्यांनी त्याठिकाणी सांगितलं आणि त्याने आता प्रवेश पण केलेला असं दिसून येतो परंतु दादांच्या बरोबर मी प्रामाणिक आहे आणि आम्हाला कुणाबरोबरही बाकी जाण्याचा प्रश्नच येत नाही आम्हाला देखील विचारणा
होती काही लोकांकडून की बाबा तुम्ही काय करणार तुम्ही काय करणार परंतु दादांनी काही जरी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मला काही दिलं नाही तरी मी दादांशी प्रामाणिक आहे आणि दादांचा विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आणि पुण्यामध्ये आमची पक्ष संघटना ही खूप मजबूत आहे साधारण 1500 ते 1600 पदाधिकारी आमचे पुणे शहरामध्ये दादांसाठी राष्ट्रवादी पक्षासाठी काम करतात आणि एक चांगलं काम आम्ही पुणे शहरामध्ये या वर्षभराच्या कालावधीमध्ये उभं केलेलं आहे आणि मला वाटतं की पुण्यामध्ये कुठली फूट पडणार नाही उलटं मी दादांना कराडचे काही नगरसेवक 14 नगरसेवक
आहेत जे दादांबरोबर जोडण्याचा माझा एक प्रयत्न आहे आणि ते निश्चितपणे जोडले जातील आणि त्याचप्रमाणे अजून एक नगरसेविका जी पूर्वी गेली होती त्या ठिकाणी रेखा टिंगरे म्हणून होती तर ती देखील आता आमच्या बरोबर येतील म्हणजे अशी चर्चा होत असते आता पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गेल्यावर मग पुण्याचे अध्यक्ष काय करणार असा विषय होत असतो आणि प्रत्येक जण विचारणा करत असतं परंतु माझा तसा कुठलाही विचार कधीही नसणार आहे कारण की मी दादांशी प्रामाणिक आहे आणि एक चांगलं काम दादांबरोबर मला उभं करायचंय दादांनी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये
कुठली संधी देऊ अथवा न देऊ परंतु मी आयुष्यभर दादांबरोबर राहणार आहे असे वक्तव्य दीपक मानकर यांनी केले आहे