लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक विचार 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारक विचार

अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते. अण्णाभाऊ साठे यांची माहिती आपल्याला असलीच पाहिजे. त्यांचा जन्म सांगलीत 1 ऑगस्ट 1920 साली झाला. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात आजही मानाचे स्थान आहे. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. यासोबतच त्यांच्या अनेक कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी; लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. त्यांचे अण्णाभाऊ साठेंचे क्रांतिकारक विचार (Annabhau Sathe Quotes), अण्णाभाऊ साठे कविता आणि अण्णाभाऊ साठे शायरी, पोवाडे आजही अभिमानाने गायले जातात. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे.

अण्णाभाऊंनी कथा, कांदबऱ्या, पोवाडे, लावणी, नाटक, लोकनाट्य, पद, गीते अशा अनेक प्रकारचे साहित्य लिहीले.

अनिष्ठ धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे

हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.

जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव

नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते.

जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे, गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे

निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नकोस कुणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहेस

दलितांतही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामासांचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवावर महाकाव्य रचणार त्याला हवा असतो….

मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परळात राहणारे, रात दिवस राबणारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती

कला ही नेहमी गरिबाच्या झोपडीत जन्माला येते, महालात जन्माला येतात ती गरिबाचे रक्त पिणारी ढेकणं.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठेंचे खूप मोठे योगदान होते. त्यांनी आपल्या शाहिरीतून या चळवळीला सहकार्य केले होते. यासाठीच वाचा या काही निवडक अण्णाभाऊ साठे शाहिरी.

माणुसकी पळाली पार, होऊनी बेजार, पंजाबातून

सूडाची निशा चढून, लोक पशुहून, बनले हैवान

 द्या फेकून जातीयतेला, करा बंद, रक्तपाताला, आवोरोनि हात आपुला, भारतीयांनो इभ्रत तुमची इर्षेला पडली, काढा बाहेर नौका देशाची वादळात शिरली, धरा सावरून एकजुटीने दुभंगली दिल्ली, काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली

तू ऊठ आता सत्वर, हे तुडवून दंगेखोर, म्हणे अण्णा साठे शाहीर, सावरून धर, तुझी तू शांतिध्वजा सत्वर

सुख शांतीचा पोवाडा, गांजल्यांना ऐकवा, जाऊ द्या ती खोल खाली दामिनीसम शाहिरी

प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा,

स्मरोनि गातो, कवना || धृ ||

स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करूनिया गर्जना, लोक उठविला जागाल केला त्या लोकमान्यांना

कठिण काळि राष्ट्र नोकांना

मार्ग दाखविला तयांना

देशा दिली ज्यांनी प्रेरणा || 1 ||

महाराष्ट्र मायभू अमुची, मराठी भाषिकांची, संत मंहताची, ज्ञानवंताना जन्म देणार

नररत्नांचे दिव्य भांडार, समरधिर घेत जिथे अवतार|| जी ||

शौर्याची अजरामर महती, आजही नांदती, सह्याचलावरती, मावळा दख्खनचा राहणार, स्वाभिमानार्थ जिणे जगणार, मराठा मानी आणि दिलदार || जी ||

ही अवनी आदिवाशांची, कोळी भिल्लांची, मांग रामोळाची

कैक जातीची प्राणाहुनि प्यार, परंपरा ज्यांची असे अपार

पुढे शाहीर तीच गाणार || जी ||

आम्हाला चीड दास्यांची, जुलमी सत्तेची, परचक्राची

इतिहास साक्ष देत याला, करुनि आम्ही जबरदस्त हल्ला

अन्यायाचा कडेलोट केला ||जी||

संस्कृत भाषेची मानी, विद्येचे धनी, एकदा त्यांनी

एक अन्याय केला अति घोर, मराठी असुन आमची थोर

दडपून केले तिला कमजोर ||जी||

ज्ञानाच्या मक्त्तेदारांनी कट पहा केला

ती ठेकेदारी तगवून पुढे नेण्याला

मानून हीन मराठीला, संस्कृतीचा पगडा बसवला

प्रगतिचा मार्ग रोखिला, महाराष्ट्र दीन जाहला

अंतरला मायबोलिला, इतिहास, पुराणे, वेद दिसेना त्याला

महाराष्ट्र संस्कृतीला, हा राहु ग्रासु लागला

अंधार पूर्ण दाटला, परि त्याहि कठिण समयाला

ज्ञानेश्वर संत पैठणी आले उदयाला

घनघोर महाराष्ट्राची | ज्ञानेश्वरांची गर्जना | झाली ||

संस्कृत भाषेची भिंत | करुनि आघात | त्यांनी फोडली |

की माय मराठी बोली | बाहेर काढिली | स्वैर सोडीली ||

अज्ञाना, दीन दलिता | भगवद् गीता | त्यांनी वदवीली

1ऑगस्ट हा दिवस अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस असल्याने त्या दिवशी अनेक ठिकाणी अण्णा भाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो.

1. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

2. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

3. सागराचे पाणी कधी आटणार नाही, अण्णाभाऊ तुमची आठवण कधी मिटणार नाही

4. जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

5. साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.

6. समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुर्ननिर्माण अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

7. प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर, लेखक, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

8. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व समाजसुधारक

9. मानवमुक्तीचा शिलेदार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

10. आपले विचार, कार्य आणि प्रतिमेतून लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांना आधार देणारे लोक शाहीर अण्णाभाई साठेच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment