श्रीराम मोबिलिटी बुलेटिन – फ्लीट युटिलायझेशन 90% वाढले, सणासुदिपूर्वीच्या काळादरम्यान सर्वाधिक वाढ, व्यावसायिक वाहनांच्या किमतींत वाढ

फ्लीट युटिलायझेशन 90% वाढले, सणासुदिपूर्वीच्या काळादरम्यान सर्वाधिक वाढ,

माल वाहतुकीसाठी ट्रक भाडे स्थिर, वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतींत वाढ: श्रीराम मोबिलिटी बुलेटिन

• बांधकाम आणि बांधकाम साहित्यासाठी (अर्थ मुविंग इक्विपमेंट) वापरल्या जाणाऱ्या उपकरणांसह व्यावसायिक वाहने तसेच मालवाहतूक वाहनांच्या विक्रीत वाढ

• कार्ट असलेल्या ई-रिक्षा आणि तीन चाकीच्या (मालवहन) विक्रीतही वाढ दिसून आली आहे 

• इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 चे परिणाम अद्याप अपेक्षेशी जुळत नसल्याने सप्टेंबरमध्ये ईव्ही विक्रीत मोठी घसरण दिसून आली आहे 

• कार आणि दुचाकीसह प्रवासी वाहनांच्या विक्रीत घसरण  

• टायरच्या किमती आणि टोल शुल्कात वाढ होऊनही मालवाहतूक दर स्थिर. परंतु मालवाहतूक दरात वाढ होण्याचे ट्रक वाहतूकदारांकडून संकेत 

पुणे : संपूर्ण भारतात सणापूर्वीचा साठा सुरू राहिल्याने सप्टेंबरमध्ये ट्रकची भाडी, जी माल वाहतुकीची प्रमुख सूचक मानली जातात, स्थिर राहिली. फ्लीट वापराचा स्तर, अलीकडच्या काळातील ७०% वरून ९०% पर्यंत वाढला, जेणेकरून मालवाहतुकीचे दर फारसे न वाढता स्थिर राहिले.

बेंगळुरू-मुंबई-बेंगळुरू मार्गावरील ट्रकच्या भाडेदरात सर्वात जास्त 1.6% वाढ झाली, तर कोलकता-गुवाहाटी-कोलकता मार्गासाठी दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्ली-बेंगळुरू-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई-दिल्ली मार्गांवर अनुक्रमे 1% आणि 0.7% अशी मध्यम वाढ नोंदवली गेली.

लवकरच येत असलेल्या सणासुदीच्या हंगामामुळे व्यावसायिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहक, कार्टसह ई-रिक्षा आणि तीन-चाकी (मालवहन) यासारख्या नवीन व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बांधकाम क्षेत्रासाठीची वाहने (व्यावसायिक) आणि अर्थ मूव्हिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या विक्रीमध्ये झालेल्या वाढीतून पायाभूत सुविधांच्या विकासकामांना पावसाळ्यानंतर अधिकाधिक चालना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वाय. एस. चक्रवर्ती, एमडी आणि सीईओ, श्रीराम फायनान्स लिमिटेड म्हणाले, “सणासुदीच्या आधीचा सकारात्मक दृष्टीकोणा मुळे मालवाहतुकीच्या वाढ दिसून येत आहे आणि फ्लीट युटिलायझेशनने ९०% ची पातळी गाठली आहे जी अलीकडच्या काळात पाहिलेली सर्वोच्च पातळी आहे. तथापि, गेल्या काही आठवड्यांत टायरच्या किमती आणि टोल शुल्कात वाढ झाल्याने मालवाहतुकीच्या दरात वाढ होणार असल्याचा इशारा ट्रक मालकांनी दिला आहे. मालवाहतूकदारांनी इंधन दरात कपातीची मागणी केली आहे आणि त्यामुळे मालवाहतुकीच्या दरातील कोणत्याही वाढीचा भार काही प्रमाणात हलका होऊ शकतो. आगामी सणासुदीचा हंगाम प्रवासी वाहनांच्या विक्रीला आवश्यक असलेली गती देईल, अशी आमची अपेक्षा आहे.”

वापरलेल्या व्यावसायिक वाहन (यूसीव्ही) बाजारामध्ये, १.५ ते २ टन श्रेणीच्या वाहनांच्या किमतीत वर्ष-दर-वर्ष (वायओवाय) आधारावर 21% वाढ नोंदवली गेली आहे, तर ७.५ ते १६ टन श्रेणीमध्ये 12% वाढ झाली. परंतु, 16 ते 19 टन श्रेणीच्या वाहनांच्या दरामध्ये १६% घसरण झाली आहे.

वापरलेल्या प्रवासी वाहनांच्या किमतींमध्ये, मारुती बलेनो आणि मारुती डिझायर या कारच्या विक्रीत अनुक्रमे ८% आणि ७% (वायओवाय) अशी सकारात्मक वाढ नोंदवली आहे, परंतु अन्य प्रकारांतील वाहनांना विक्रीत सातत्याने घसरणीचा सामना करावा लागला. घसरणीचा हाच प्रवाह वापरलेल्या दूचाकी वाहनांच्या विक्रीतही आढळला असून बहुतौन्श ब्रॅंड्समध्ये घसरण झाली आहे.

नवीन प्रवासी वाहनांच्या विक्रीत, सप्टेंबर 2024 मध्ये मोटार कारच्या विक्रीत महिना-दर-महिना आधारावर (एमओएम) १४% घट झाली (वर्ष-दर-वर्ष आधारावर २०% घट) आहे . तर दुचाकी विक्रीत महिना-दर-महिना आधारावर १०% घट झाली (वर्ष-दर-वर्ष आधारावर ८% घट) आहे. याच्या मागचे कारण, संभाव्य खरेदीदारांचा सावध दृष्टिकोण असू शकतो आणि आगामी सणाच्या हंगामात दोन्ही विभागांमध्ये मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे.

विक्रीला चालना मिळण्यासाठी सरकारने विविध उपक्रम राबवूनही ईव्ही विभागात विविध समस्या जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. खरेदीदार सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. त्यामु‌ळे दुचाकी ईव्हीच्या विक्रीत २३% (महिना-दर-महिना आधारावर) आणि ४४% (वर्ष-दर-वर्ष आधारावर) तर चारचाकी ईव्हीच्या विक्रीत ३१% (महिना-दर-महिना आधारावर) आणि ४३% टक्के (वर्ष-दर-वर्ष आधारावर) घट झाली आहे. 

सप्टेंबर २०२४ मध्ये, पेट्रोलचा वापर महिना-दर-महिना आधारावर ६% कमी झाला आहे, तर डिझेलचा वापर २% कमी झाला आहे. फास्ट-टॅगचे संकलन ३.२% घटले असले तरी, टोल आकारणी जास्त झाल्यामुळे एकूण टोल महसूल वाढलेला आहे. ई-वे बीलनिर्मिती ऑगस्ट २०२४ मध्ये दरमहा आधारावर स्थिर आहे, परंतु वार्षिक तुलनेत त्यात १३% वाढ झाली आहे. 

भारतीय अर्थव्यवस्था सणासुदीच्या मोसमासा

ठी सज्ज होत असताना, मागणी वाढल्याने आणि बाजारातील भावना सुधारल्यामुळे ट्रकिंग उद्योग आणखी वाढीसाठी सज्ज झाला आहे.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन आयोजित केले आहे. दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आटोक्लस्टर

Spread the love
Read More »

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे