भारतातील पहिल्या पॅराडॉक्स म्युझियमचे मुंबईत उद्घाटन – भ्रमांच्या जगाचा अनुभव घ्या

भारतातील पहिल्या पॅराडॉक्स म्युझियमचे मुंबईत उद्घाटन – भ्रमांच्या जगाचा अनुभव घ्या

पुणे: पॅराडॉक्स म्युझियम, जगभरात प्रसिद्ध असलेला ब्रँड जो इंटरॅक्टिव्ह आणि इमर्सिव्ह प्रदर्शनांसाठी ओळखला जातो, पॅराडॉक्स म्युझियमने मुंबईत आपले पहिले म्युझियम सुरू केले आहे. या म्युझियममध्ये 55 हून अधिक अद्वितीय पॅराडॉक्स-थीम असलेली प्रदर्शने आणि 15 इमर्सिव्ह रूम्स आहेत, ज्यामुळे अनेक आकर्षक आणि आश्चर्यकारक अनुभवांचा आनंद घेता येतो. या ठिकाणी तुम्ही इंटरेक्टिव्ह डिस्प्लेमध्ये मग्न होताल आणि या बरोबर ऑप्टिकल भ्रमामागील विज्ञान समजून घेता येईल. पॅराडॉक्स म्युझियमची मुंबईची तिकिटे 4 ऑक्टोबरपासून उपलब्ध आहेत (https://paradoxmuseummumbai.com/) 

साऊथ मुंबईच्या फोर्ट परिसरात, चर्चगेट आणि CSMT स्थानकांपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या संग्रहालयात, वास्तविकतेच्या पलीकडे पाऊल टाकण्याचे आणि 60 मिनिटांचा विरोधाभासी जगाचा प्रवास अनुभवता येईल. या अनुभवात ‘रिव्हर्स्ड रूम’ आहे, ज्यामुळे वास्तवाबद्दलचा तुमचा दृष्टीकोन बदलतो; ‘पॅराडॉक्स सोफा’ एक आकर्षक भ्रम निर्माण करते, ‘झिरो ग्रॅव्हिटी रूम’ मध्ये वास्तव अनुभवता येतील, ‘कॅमोफ्लाज रूम’ तुमच्या सभोवतालच्या वातावरणात मिसळते, तर ‘पॅराडॉक्स टनेल’ तुमच्या संवेदनांना गोंधळात टाकते, ‘एम्स रूम’ एक ऑप्टिकल भ्रम निर्माण करते.

पॅराडॉक्स म्युझियम विज्ञान, कला, आणि मानसशास्त्राचे कलात्मकपणे मिश्रण करून एक आकर्षक शैक्षणिक अनुभव निर्माण करते. हे मुलांमध्ये जिज्ञासा जागृत करते आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. हे ठिकाण कॉर्पोरेट टीम-बिल्डिंग उपक्रमांसाठी देखील उत्तम आहे आणि सोशल मीडियासाठी आकर्षक ठिकाण आहे.

मुंबईतील उद्घाटनाबद्दल बोलताना, संस्थापक मिल्टोस कंबॉराइड्स म्हणाले, “मुंबईत पॅराडॉक्स म्युझियमचे पदार्पण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या संग्रहालयात विविध प्रदर्शने आहेत जी तुमच्या दृष्टीकोनाला आव्हान देतात आणि वास्तवाचे एक नवीन दृष्टिकोन देतात. मुंबईचे वातावरण या नाविन्यपूर्ण अनुभवासाठी योग्य ठिकाण आहे, ज्यामुळे एक विस्मयकारक आणि आनंददायक अनुभव मिळेल. येथेच, मुंबईच्या हृदयात, तुम्हाला एका जादुई जगाचा शोध घेण्याची चांगली संधी आहे!”

पॅराडॉक्स म्युझियमचे सीईओ हॅरिस डौरोस म्हणाले, “पॅराडॉक्स म्युझियममध्ये अनेक आकर्षक प्रदर्शने आहेत. संग्रहालयाचा नाविन्यपूर्ण अनुभव प्रेरणादायी आहे आणि एका अनोख्या शोध प्रवासाचे अनुभव देतो.”

2022 मध्ये मिल्टोस कंबॉराइड्स आणि साकिस तानिमानिडिस यांनी स्थापन केलेल्या पॅराडॉक्स म्युझियमने जगभरात वेगाने प्रसिद्धी मिळवली आहे. पॅरिस, मियामी, स्टॉकहोम आणि लंडन, शांघाय, बर्लिन या प्रमुख शहरांमध्ये असलेली ठिकाणे हे सिद्ध करतात. लंडनमधील नुकत्याच जुलैमध्ये झालेल्या उद्घाटनामुळे ब्रँडची जलद वाढ झाली आहे, ज्यामुळे मुंबईकरांसाठी हे एक रोमांचक आकर्षण आहे. या नाविन्यपूर्ण संग्रहालयाचा अनुभव चुकवू नका, जो जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करत आहे!

पॅराडॉक्स म्युझियम 4 ऑक्टोबर 2024 रोजी सार्वजनिकपणे उघडणार आहे. 

हे सोमवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत खुले असेल. तिकिटे पॅराडॉक्स म्युझियमच्या वेबसाइटवर आणि प्रमुख तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, आणि त्यांच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत:

अधिक माहितीसाठी, भेटीच्या वेळा, तिकीटे, इव्हेंट्स आणि विशेष ऑफर्ससाठी कृपया https://paradoxmuseummumbai.com/ येथे भेट द्या.

* पॅराडॉक्स म्युझियम बद्दल *

पॅराडॉक्स म्युझियम ही इंटरएक्टिव्ह मनोरंजनाची अग्रणी कंपनी आहे, जी तिच्या असामान्य, मजेदार आणि रोमांचक दृष्टिकोनासाठी जगभरात ओळखली जाते. पॅराडॉक्स म्युझियम शिक्षणात्मक अनुभव तयार करते जे प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि प्रेरणा देतात. जगभरात 12 ठिकाणी 1,200 हून अधिक प्रदर्शने असून, 1.5 मिलियनाहून अधिक स्वागत केले आहे.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन आयोजित केले आहे. दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आटोक्लस्टर

Spread the love
Read More »

डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आठवे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे