पुणे – कोथरूड मधील “राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब मार्ग” या मार्गावरील असलेल्या पुणे मेट्रोच्या पिलरवर मोकळ्या जागेत “राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब” यांच्या दैदिप्यमान जीवनातील वैभवशाली ठळक प्रसंगांचे म्युरल उभारावे – शहराध्यक्ष दीपक मानकर
स्वराज्याच्या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ या केवळ आदर्श माता नव्हत्या तर वीरकन्या, वीरपत्नी,धीरोदात्त राजमाता होत्या. त्या शस्त्र,शास्त्र पारंगत,राज्य कारभार कुशल होत्या. त्यांच्या मार्गदर्शनानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य उभारले. जिजामातांचे धैर्य, कर्तव्याची तीव्र भावना, स्वाभिमान यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक आणि योद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची १२ जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी कोथरूड मधील “राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब मार्ग” या मार्गावरील असलेल्या पुणे मेट्रोच्या पिलरवर मोकळ्या जागेत “राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब” यांच्या दैदिप्यमान जीवनातील वैभवशाली ठळक प्रसंगांचे म्युरल उभारावे असे निवेदन महामेट्रो,पुणे विभाग स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग संचालक श्री. अनिलकुमार कोकाटे, कार्यकारी संचालक मा.श्री.श्रवण हर्डीकर यांना दिले आहे.
दि.२९ डिसेंबर २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून कोथरूड येथील पौड रोड ते चांदणी चौक या रस्त्याचे नामकरण “राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब मार्ग” असे करण्यात आले आहे. सध्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब मार्ग, पौड रोड ते चांदणी चौक या रस्त्यावर असलेल्या मेट्रोच्या पिलर्स लगतच्या मोकळ्या जागेत आणि पिलरवर अनेक ठिकाणी जाहिरातींचे फलक, डिजिटल बोर्ड तसेच सुशोभीकरणाकरिता विद्युत रोषणाई, डेकोरेशन करण्यात येत आहे. पुणे शहरात जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून मेट्रोच्या पिलर्स वर जाहिराती व इतर माहिती दाखवली जात आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब यांचा दैदिप्यमान जीवन प्रवास म्युरलच्या माध्यमातून पाहणे पुणेकर नागरीक जास्त पसंद करतील. या मोकळ्या जागेमध्ये “राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या वैभवशाली जीवनपटावर आधारित म्युरल तयार केले तर पुणेकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट असेल. या शिल्पांच्या माध्यमातून पौड रोड ते चांदणी चौक या मार्गाला “राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब मार्ग” असे नाव दिले गेलेले आहे ते सार्थक होणार आहे.
आज राजमाता जिजाऊचे विचारच या देशात प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू शकतो. त्यासाठी आमच्या आजच्या मातांनी हा विचार अंगीकारावा, तो आत्मसात करून त्या विचारानुसार आपली वाटचाल करावी. त्यांचा विचार जिवंत ठेवणे हेच खऱ्या अर्थाने या मातेसाठी अभिवादन ठरेल. राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट जर आपण म्युरलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला तर नक्कीच मेट्रोच्या वैभवात भर पडेल यात शंका नाही. तसेच नागरिकांना जाहिराती किंवा सुशोभीकरणापेक्षा ही संकल्पना जास्त रुचेल आणि आवडेल देखील. निवेदन दिल्यानंतर संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता सकारात्मक चर्चा झाली व लवकरच याबाबत निर्णय घेऊन कोथरूड मधील “राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब मार्ग” या मार्गावरील पुणे मेट्रोच्या पिलर वर असलेल्या मोकळ्या जागेवर “राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब” यांच्या दैदिप्यमान जीवनातील वैभवशाली ठळक प्रसंगांचे म्युरल उभारले जाईल असे आश्वासित केले. असे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले
आपला,
श्री. दीपक माधवराव मानकर
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे.