*रुणवाल मेडोज बिल्डिंग नं. १ ते १३ सहकारी गृहरचना संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक यशस्वीपणे पार पडली; नव्या मंडळाकडून विकासकामांवर भर*
पुणे: रविवार दि. १३ एप्रिल २०२५ – रोजी वारजे परिसरातील एक महत्त्वाची गृहनिर्माण संस्था असलेल्या रुणवाल मेडोज बिल्डिंग नं. १ ते १३ सहकारी गृहरचना संस्था संघ मर्यादित यांच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच यशस्वीपणे पार पडली.
या निवडणुकीत एकूण नऊ जागांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये एका पॅनलमध्ये पुढील 5 जण बहुमताने निवडून आले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत अध्यक्ष लहू वसंत धुमाळ, सचिव तापकीर साहेबराव गेनभाऊ, कोषाध्यक्ष गजलकर रवींद्र दीनानाथ, बगाडे संभाजी दिगंबर व गडदे विजय बजरंग, यांनी एकत्र येऊन सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
फेडरेशन ची स्थापना 2009 साली झाली व 2016 साली निवडणूक बिनविरोध पार पडली. तेव्हा पासून आज पर्यंत लहू वसंत धुमाळ हेच अध्यक्ष होते. यांनी मोठ्या जबाबदारीने काम करत सोसायटीच्या विकासासाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबवले होते. त्यामध्ये गणपती मंदिर उभारणीसारखा सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. स्थानिक आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या मदतीने सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आले. सोबतच, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ओपन जिमची उभारणीही करण्यात आली.
तांत्रिक पातळीवर देखील या कालावधीत अनेक सुधारणा करण्यात आल्या. सोसायटीमध्ये MNGL गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आणि जलसंपत्तीच्या व्यवस्थापनासाठी पाण्याच्या मुख्य लाईनचा व्यास वाढवून पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यात आला. क्लब हाऊसची जीर्ण अवस्था लक्षात घेता त्याची संपूर्ण दुरुस्ती करून तो सभासदांच्या उपयोगासाठी पुन्हा खुला करण्यात आला. मात्र, या सगळ्या सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही दुर्दैवी घटनाही घडल्या. सोसायटीतील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सतत अडथळे निर्माण झाले ते नवीन कार्यकारिणी स्थापना न झाल्यामुळें. वॉचमन , सार्वजनिक CCTV कॅमेऱ्यांच्या वायरिंगमध्ये अडथळा, गाड्यांच्या स्टिकर्स वाटपाचा अभाव, स्वच्छतागृहाची उभारणी , गाड्यांचे नुकसान, बागेतील झाडांची कापणी आणि मेंटेनन्स वर्गणी योग्य वेळेत जमा न होणे यासारख्या घटनांमुळे सोसायटीचे वातावरण थोडे तणावपूर्ण आणि अशांत राहिले.
यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. या सगळ्या घटनांमुळे सोसायटीच्या एकात्मतेला धक्का बसत होता, म्हणूनच नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन संचालक मंडळाने सादर केलेल्या नियोजनामध्ये सोसायटीच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. येत्या काळात अधिक सुरक्षा रक्षक नेमण्याची, आणि सार्वजनिक ठिकाणी अधिक आधुनिक CCTV कॅमेरे बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. सोसायटीमधील सर्व लाईट्सची दुरुस्ती व आवश्यक ती वाढ करून परिसर अधिक उजळ व सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.
सदस्यांच्या आरोग्याचा व सोयीसुविधांचा विचार करून ओपन जिमची दुरुस्ती व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच वॉचमन आणि व्हिजिटर्ससाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बालकांच्या खेळण्यासाठी असलेल्या जागेची दुरुस्ती, खेळण्यांचे नूतनीकरण, वाळू व माती टाकणे, आणि बागेमध्ये नव्या झाडांची लागवड करण्याचेही नियोजन आहे. कुंपणाची दुरुस्ती आणि संपूर्ण इमारतींमध्ये सिक्युरिटी अलार्म सिस्टीम बसवणे हाही महत्त्वाचा भाग या विकास आराखड्यात समाविष्ट आहे. फेडरेशन चा कार्यकाळ संपल्यानंतर कोविड/ महामारी / विधानसभा राज्यसभा अशा आचारसंहिता लागल्यामुळे निवडणुका पुढे पुढे कायदेशीर ढकलत गेली. त्यामुळे त्याचा परिणाम हा सोसायटी कामकाजावर झाला व त्यातून विनाकारण आपापसात गैरसमज निर्माण होऊ लागले होते. परंतु रीतसर निवडणूक फेडरेशन यांनी निवडणूक जाहिर केली व ती प्रक्रियाहि चालू केली.
या सर्व योजनांमागे एकच उद्दिष्ट आहे – रुणावल मेडोज या संकुलाचे एक सुरक्षित, सुंदर, आणि सुसंवाद असलेले निवासस्थान म्हणून रूपांतर करणे. पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष लहू वसंत धुमाळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, मतभेद होणे स्वाभाविक असले तरी ते स्वस्थ संवादाच्या माध्यमातून सोडवले जावेत. कोणत्याही सदस्याने जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणारे किंवा इतर सदस्यांना त्रास देणारे वर्तन करू नये, ही नम्र विनंतीही त्यांनी केली.
रुणवाल मेडोज संकुलाच्या विकासासाठी आणि एकत्रित वाटचालीसाठी नवीन संचालक मंडळाचा हा दृष्टिकोन निश्चितच प्रेरणादायक आहे. त्यांचा सहभाग, सकारात्मक दृष्टिकोन आणि सहकार्याने पुढे जाण्याची तयारी सोसायटीच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच पायाभूत ठरेल. एकूणच प्रकार परिषद मोठ्या आनंदात पार पडली. महिंद्र गोरे यांनी सगळ्यांचे आभार मानले
धन्यवाद 🙏😊
अधिक माहितीसाठी संपर्क :
जयश्री डिंबळे ९६२३९६८९९०