मांग गारुडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे लोणी काळभोर येथे “मांग गारुडी समाज मुक्ती दिन सोहळा” उत्साहात संपन्न 

मांग गारुडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे लोणी काळभोर येथे मांग गारुडी समाज मुक्ती दिन सोहळ्याचे आयोजन उत्साहात संपन्न 

मांग गारुडी समाज अजूनही मूलभूत अधिकारापासून वंचित – रामचंद्र सकट

पुणे -मांग गारुडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे लोणी काळभोर येथील पालखी स्थळ येथे मांग गारुडी समाज मुक्ती दिन सोहळ्याचे आयोजन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यासाठी मांग गारुडी समाज युवक संघाचे संस्थापक रामचंद्र सकट, राष्ट्रीय अध्यक्ष हरीश सकट, प्रदेशाध्यक्ष केशव राखपसरे, सचिव दादू सकट, कार्याध्यक्ष राजेश लोंढे, जनसंपर्कप्रमुख बाळासाहेब राखपसरे, विजय बोडके ,सरपंच चित्तरंजन गायकवाड उपसरपंच नासिर पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजीत बडदे दिगंबर जोगदंड, लहुजी शक्ती सेनेचे उपाध्यक्ष विजय सकट, अमोल टेकाळे, शिवसेना संघटक निलेश काळभोर, विजय राखपसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रिटिश काळात मांग गारुडी समाज या जातीला गुन्हेगारी जमात म्हणून ओळखले जात होते. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मांग गारुडी या समाजाची 31 ऑगस्ट 1918 रोजी गुन्हेगारी हजेरी बंद केली. यानिमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ मांग गारुडी समाज युवक संघातर्फे मुक्ती दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

आपल्या भाषणात मांग गारूडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक रामचंद्र सकट म्हणाले की मांग गारुडी समाजाचे लोक स्वतःला भटकी जमात समजत असले तरी शासन दरबारी त्याचे अधिकृत नोंदणी नाही. संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे भारतात 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले व 26 जानेवारी 1950 ला स्वतंत्रता, समानता, बंधुता व न्याय या आधारे भारतीय संविधान लागू झाले. यामुळे मांग गारुडी समाजाला हक्क अधिकार मिळाले व 31 ऑगस्ट 1918 रोजी मांग गारुडी समाज गुलामगिरीतून मुक्त झाला. परंतु आजही मांग गारुडी समाज अतिशय मागासलेला आहे. अजूनही मूलभूत हक्क अधिकारांपासून वंचित आहे म्हणून मान गारुडी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापुरुषांचे कार्य व त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या मुक्ती दिन सोहळ्यामध्ये मांग गारुडी समाजामध्ये शिक्षणाचे प्रबोधन, मांग गारुडी समाजाला सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारने पावले उचलावीत, मांग गारुडी समाजाला सन्मानाचा रोजगार मिळावा, मांग गारुडी समाजातील महिलांना शिक्षण मिळावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

या मुक्ती दिन सोहळ्यात 16 पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या विविध पदांसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांग गारुडी समाज युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष केशव राखपसरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश लोंढे यांनी केले. या मुक्ती दिन सोहळ्यामध्ये विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या मुक्ती दिन सोहळ्यात मांग गारुडी समाजातील नागरिक,महिला, कार्यकर्ते, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले. 

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले.  त्यांच्या निधनावर प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व राहुल विश्वनाथ

Spread the love
Read More »