राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी १३ ला आयोजन, सुमारे अडीच हजार सायकलस्वार सहभागी

*‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी १३ ला आयोजन

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; अडीच हजार सायकलस्वार सहभागी होणार

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याचे, पर्यावरपूरक जीवनशैलीचे महत्व जनमानसात रुजवण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा, डेक्कन जिमखाना अशी ही सायकल रॅली होणार आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन होणार असून, स्कायडाव्हर पद्मश्री शीतल महाजन व भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून आयोजित केला जात आहे, अशी माहिती संयोजिका, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिली.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुणे हे सायकलचे शहर म्हणून ओळखले जाते. बहुगुणी अशी सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. सायकलप्रेमी पुणेकरांनी याआधीही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही अडीच हजारांहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला आहे. या सायकल रॅलीचा भव्य सोहळा पाहण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करते. यावेळी काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच रॅलीत सहभागी प्रत्येकाला मेडल, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट दिला जाणार आहे.”

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले. 

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले.  त्यांच्या निधनावर प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व राहुल विश्वनाथ

Spread the love
Read More »