खोटे ट्रेडमार्क वापरून केली जाते भारत सरकारची तसेच महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक असे वकतव्य जर्मी फास्ट प्रणेते श्री शिवाजी देशमुख यांचा थेट धर्यशील विनायक बावसकर यांच्यावर आरोप

कॉपीराईटची खोटी केस,  सरकारची फसवणूक, जिल्हा न्यायालय पुणे, भारत सरकारचे ट्रेड मार्क ऑफिस, कॉपीराईट ऑफिस यांची केलेली फसवणूक, बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्या डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीवरती तसेच डायरेक्टर धैर्यशील विनायक बावसकरवर व इतर डायरेक्टर्स तसेच कंपनीमधील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

पुणे : भारत सरकारच्या कॉपीराइट ऑफिस, दिल्लीची फसवणूक.

“जर्मिनेटर” या ऍग्रो प्रोडक्ट नावाचे शब्द चिन्ह (ट्रेडमार्क) किंवा स्वामीत्व हक्क (कॉपीराईट) ची मालकी नसतानाही मालक आहे असे खोटे दाखवून धैर्यशील विनायक बावसकर यांनी खोटी कागदपत्रे सादर करून भारत सरकार / महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. “जर्मि-फास्ट” या शेतीतील फवारणी साठी उपयुक्त प्रॉडक्टच्या उत्पादकाविरोधात म्हणजे आमच्या विरोधात धैर्यशील विनायक बावसकर आणी रवींद्र जगदेव सुरळकर यांनी ३१ मे २०१९ रोजी जिल्हा न्यायालय पुणे येथे दिवाणी दावा क्रमांक 21 / 2019 खोटी केस दाखल केली होती. धैर्यशील विनायक बावसकर यांनी “जर्मिनेटर” या नावाचे कॉपीराईटचे सर्टिफिकेट आमच्यावरती केस दाखल केल्याच्या नंतर म्हणजे 18 जून 2019 रोजी पुढील प्रमाणे खोटी माहिती देऊन मिळवले आहे. डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पत्ता 16, कृषी उद्योग भवन मार्केटयार्ड, गुलटेकडी पुणे 411 037 ही कंपनी 1970 मध्ये स्थापन झाली आहे अशी खोटी माहिती दिलेली आहे, सदर कंपनी 24 एप्रिल 2009 रोजी स्थापन झालेली आहे, या सर्टिफिकेट मध्ये आपण 1978 साली लेखक होतो अशी त्यांनी खोटी माहिती दिली आहे कारण त्यांचा जन्म 9 जानेवारी 1978 रोजीचा आहे, तसेच त्यांनी 1978 साली इंग्रजी भाषेमधील जर्मिनेटर नावाचे पुस्तक किंवा प्रबंध लिहून 16 कृषी उद्योग भवन मार्केटयार्ड गुलटेकडी पुणे येथून भारतामध्ये प्रकाशित केला आहे अशीही खोटी माहिती दिली आहे परंतु त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे यांच्याकडून 1986 मध्ये वरील ऑफिस घेतलेले आहे यावरून स्पष्टपणे लक्षात येते की 1978 साली त्या ठिकाणी त्यांचे ऑफिस नसतानाही त्या ठिकाणावरून भारतामध्ये सदर प्रबंध प्रकाशित केला अशी खोटी माहिती कॉपीराईट ऑफिस दिल्ली यांना देऊन त्यांच्याकडून सर्टिफिकेट मिळवले आहे. धैर्यशील विनायक बावसकर या 6 महिन्याच्या अजाण बाळाने लेखक म्हणून जर्मिनेटर नावाचा इंग्रजी भाषेमधील प्रबंध लिहून भारतामध्ये प्रकाशित केला आहे हे कसे काय शक्य होऊ शकते ???. 

सदर कॉपीराईट सर्टिफिकेट चा वापर जिल्हा न्यायालय पुणे मध्ये सबमिट करून माननीय जिल्हा न्यायालयाची व आमची खूप मोठी फसवणूक केली आहे. प्रोडक्टच्या दिसण्यात, नावात आणि गुणधर्मात कोणतीही समानता नसताना, फक्त व्यावसायिकपणे आम्हाला संपवण्याच्या उद्देशाने ही खोटी केस दाखल करण्यात आली होती. २ फेब्रुवारी २०२४ रोजी आम्ही ही केस जिंकली आहे. तथापि, आमचे 5 वर्षांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा पहिला मुद्दा.

एवढेच नाही, तर भारत सरकारचे ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑफिस, अँटॉप हिल, मुंबई यांना सुद्धा वरील प्रमाणे सर्व खोटी कागदपत्रे देऊन सहा ट्रेडमार्क्स मिळवले आहेत. याची सुद्धा योग्य चौकशी पोलीस प्रशासन तसेच केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत व्हावी. हा दुसरा मुद्दा.

डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे बी बियाणे मॅन्युफॅक्चरिंगचा परवाना नसतानाही धैर्यशील विनायक बावसकर यांनी व कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कांदा व शेवगा बी-बियाणे खरेदी करून डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पॅकिंगमध्ये त्यांना चारपट भावात किंवा त्यापेक्षाही जास्त भावात पुन्हा शेतकऱ्यांना विकले आहे. सदर बी-बियाणांच्या पाकिटावरती उत्पादकाचे नाव, बॅच नंबर, लॉट नंबर, त्याची किंमत MRP, तसेच उगवण क्षमता %, तसेच त्याचे पॅकिंग वर्ष, वैधता म्हणजे एक्सपायरी, याचा कुठेही उल्लेख नाही तसेच असे बियाणे विकत असताना पक्के GST चे बिल न देता कच्चे बिल देऊन शेतकऱ्यांची व महाराष्ट्र शासनाची खूप मोठी फसवणूक करण्याचा गोरख धंदा चालू आहे याकामी कंपनी मधील अनेक कर्मचारी यांचा सरकारला फसवण्यासाठी वापर करण्यात आला आहे. हा तिसरा मुद्दा.

पहिल्यांदा 2017 मध्ये डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांनी शेती कामासाठी शेतकऱ्यांना फवारणीसाठी आवश्यक असलेले स्प्रे पंप चीन या देशातून आयात (इम्पोर्ट) केले, 01 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू झाला, त्यांनी आयात केलेले पंप जुलै महिन्यामध्ये त्यांच्याकडे आले, परंतु स्प्रे पंपांची विक्री करताना जून 2017 मध्ये 6% व्हॅट ची मागील बिले बनवून जीएसटी कमी करून शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे. हा चौथा मुद्दा.

कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या कडून खोटी परचेसची बिले तयार करून ती शासनाला सबमिट करून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केलेली आहे. नोटाबंदीच्या काळापासून 2015 – 2016 पासून ते आतापर्यंत, तसेच कोरोना काळात 2020 – 2021 मध्ये सुद्धा अगोदरचा काळा पैसा व्हाईट करण्यात आला आहे. हा पाचवा मुद्दा.

मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरी करून बेहिशोबी मालमत्ता साठवली आहेत तसेच आतापर्यंत 38 ते 40 चार चाकी गाड्या घेण्यात आलेल्या आहेत, कर चोरी करून जमवलेल्या बेहिशेबी मालमत्ता, गाड्या व कंपनीमधील आर्थिक व्यवहार यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर झालेला आहे, कंपनीचे मालक तसेच त्यांचे कुटुंबीय व कंपनीमधील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, व त्यांच्या कंपनी मधील दोन मॅनेजर एक रवींद्र जगदेव सुरळकर व मनीष ग्यानम कानपुरे यांच्या नावावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार व मालमत्तां असण्याची शक्यता आहे तरी सर्वांच्याच पैशाच्या स्त्रोताची व नावावरती असलेल्या मालमत्तांची तसेच सर्व करंट अकाउंट आणि सर्वांचे सेविंग अकाउंट बँक खात्याची सखोल चौकशी करावी अशी मी मागणी याद्वारे करीत आहे. हा सहावा मुद्दा.

कृषी पदवीधारक नसतानाही सुवर्णा विनायक बावसकर यांच्या नावाने बोगस महाराष्ट्र ऍग्रो केमिकल्स नावाने मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे. हा सातवा मुद्दा. 

Dr बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांनी आमच्या विरोधात धैर्यशील विनायक बावसकर व रवींद्र जगदेव सुरळकरने यांनी जिल्हा न्यायालय पुणे येथे 31 मे 2019 रोजी खोटी केस दाखल केल्यामुळे आमच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. ठरवून व खोट्या मार्गाने व्यावसायिकदृष्ट्या आम्हाला संपवण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र कोर्टाने 02 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या बाजूने निर्णय देत डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच धैर्यशील विनायक बावसकर व रवींद्र जगदेव सुरळकर यांचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी वरील कोर्ट केसच्या संदर्भात आणि बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे डायरेक्टर धैर्यशील विनायक बावसकर आणि कंपनीचे कर्मचारी यांच्या अनेक प्रकारच्या फसवणुकी व गैरकारभाराची सविस्तर माहिती देण्यासाठीची पत्रकार परिषद पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे संपन्न झाली. या पत्रकार परिषदेला मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार उपस्थित होते तसेच पत्रकार परिषदेसाठी विशेष करून श्री विजय कुंभार सर हेही आवर्जून उपस्थित होते. आमच्यावरती झालेला अन्याय तसेच आमचे झालेले आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासाच्या विरोधात आम्ही धैर्यशील विनायक बावसकर आणी रवींद्र जगदेव सुरळकर तसेच त्यांची डॉ बावसकर टेक्नॉलॉजी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनी यांच्या विरोधात मुंबई हायकोर्ट मध्ये केस दाखल करणार आहोत, तसेच त्यांनी खोटी माहिती देऊन मिळवलेले सरकारी सर्टिफिकेट चा वापर आमची व माननीय जिल्हा न्यायालय यांची फसवणूक करण्यासाठी पुणे जिल्हा न्यायालय मध्ये वापर केला म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस सुद्धा आम्ही पुणे जिल्हा न्यायालय येथे करणार आहोत आहोत. याबाबत माहिती देण्यासाठी आम्ही हि पत्रकार परिषद आयोजित केली होती.

 

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड, सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार 

  पहिल्याच अधिवेशनात आ. अमित गोरखेंचे रेकॉर्ड  सहा दिवसांत डझनभर प्रश्न मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातले पहिले आमदार  पिंपरी, पुणे (दि. २३ डिसेंबर २०२४) नव्या उद्योजकांसह

Spread the love
Read More »