- *बोपोडी येथे अत्याधुनिक गॅस शव दाहिनी आणि प्रदूषण रोधक प्रणालीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते लोकार्पण*
पुणे : माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि निधीतून बोपोडी येथील मुक्तिधाम स्मशानभूमीतील पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक गॅस शवदाहिनी आणि प्रदूषण रोधक चिमणीचे लोकार्पण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अविनाश कदम, निलेश वाघमारे, सचिन चव्हाण ,ज्वेल अँथोनी, रुपेश पिल्ले, रिकेश पिल्ले, संजय पिल्ले, बाळू मोरे, बापू रणदिवे, आप्पासाहेब वाडेकर, कलावती भंडारी, नंदा निकाळजे, आरती देठे आणि परिसरातील नागरीक व पदाधिकारी उपस्थित होते.
“मुळा आणि पवना नदीच्या संगमावर असलेल्या मुक्ती धाम स्मशानभूमी बोपोडी येथे पूर आल्यानंतर स्मशानभूमी पाण्यात गेल्याने नागरिकांचे अंत्यविधीसाठी हाल होत होते. म्हणून या ठिकाणची गॅस शवदाहीनी पहिला मजला बांधून वर नव्याने बांधण्यात बसविण्यात आली आहे. यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली ,तरी सुद्धा नागरिकांना इतरत्र अंत्यविधीसाठी जावे लागणार नाही असे आश्वासन यावेळी माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांनी दिले.