“मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, पण…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितला न ऐकलेला किस्सा

मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, पण…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितला न ऐकलेला किस्सा

“नगरसेवक झालो तो दिवस कालचं घडल्यासारखं वाटतं आहे. यानंतर मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेचा मोठा पाठिंबा त्यावेळी मला होता”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती आहे. यानिमित्ताने भाजपच्या वतीने नागपुरात अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी समारोह व भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता ऐकवली. काल के कपाल लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ, अशी कविता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकवली.

आज आमच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मी सत्कार करणं टाळतो. मात्र आज सत्कार स्वीकारत असताना दोन भावना माझ्या मनात होत्या, ज्यांच्याकडे पाहून राजकारण त्या अटलजींच्या जन्माशताब्दी हा सत्कार होत आहे. ज्यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचा असतं अशा नितीनजींच्या हस्ते माझा सत्कार झाला. त्यामुळे घरच्या माणसाच्या हाताने सत्कार झाल्याने मी तो स्वीकारला. लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे आपला पराजय झाला. हा या ठिकाणी सत्कार होत असला, तो आमचा असला तरी तो कार्यकर्त्यांच्या वतीने स्वीकारतो आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी सांगितली राजकारणात येण्याची गोष्ट

“सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की अकेला देवेन्द्र क्या करेंगा, पण मी एकटा नव्हतो. आमचे कार्यकर्ते, नेते माझ्यासोबत होते”, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची राजकारणात येण्याची गोष्ट सांगितली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अयोध्येतील कारसेवची आठवण सांगितली.

मी राजकारणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलेलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर विद्यार्थी परिषदेचं पूर्ण काम करत होतो. विद्यार्थी परिषदेच्या असताना वेळेला कारसेवक म्हणून गेलो. त्यावेळी आम्ही सगळे बदायुच्या जेलमध्ये होतो. सुनील आंबेकरांनी भाजपात काम करायचं निर्णय घेतल्याचे सांगितलं. मी तेव्हा मला राजकारणात काम करायचं नाही”, असं सांगितलं, असा किस्सा देवेंद्र फडणवीसांनी सांगितला.

“नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेचा मोठा पाठिंबा”

“आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की आपल्याला काम करायचं असतं. मला निवडणुकीची तयारी कर असं मला भाजपनं सांगितलं. माझं १९९२ ला २१ वय पूर्ण झालं. त्यानंतर मला वॉर्ड क्रमांक 69 म्हणून नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्यास सांगितली आणि निवडून आणले. नगरसेवक झालो तो दिवस कालचं घडल्यासारखं वाटतं आहे. यानंतर मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडेचा मोठा पाठिंबा त्यावेळी मला होता”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“एक है तो सेफ है या मंत्रांनी काम केलं”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक है तो सेफ है या मंत्रांनी राज्यात जादूचं काम केलं. लाडकी बहिणी, शेतकरी यांनी जादू केली. आपण निवडून आलो. भगवान देता है, तो छप्पर फाँड के देता है”, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

 

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

“मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, पण…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितला न ऐकलेला किस्सा

मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, पण…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितला न ऐकलेला किस्सा “नगरसेवक झालो तो दिवस कालचं घडल्यासारखं वाटतं आहे. यानंतर मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता

Spread the love
Read More »