देगलूरचे लेखक गणेश चप्पलवार यांचे पुस्तक दिल्लीत प्रकाशन
देगलूर :
दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पत्रकार गणेश चप्पलवार यांचे कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथ या पुस्तकाचे प्रकाशन देशाची राजधानी दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी तालकटोरा स्टेडियम येथे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान संमेलनाचे उद्घाटक नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथ हे पुस्तक वल्लरी प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले. या पुस्तकात कृषी पर्यटक उद्योग व उद्योजक यांच्या भरघोस आर्थिक यशाची कहाणी वाचायला
गणेश चप्पलवार हे यांचे मुळचे देगलूरचे आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण देगलूर मध्ये झाले आहे. लेखक पत्रकार, ‘ॲग्रो टुरिझम विश्व, पुणे’ या संस्थेचे संचालक, कृषी पर्यटन उद्योगांचे अभ्यासक आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेती व शेतीपूरक व्यवसायाचे पर्यटन घडवून आणून कृषी पर्यटक केंद्रांना व कृषी पर्यटकांना संस्थेच्या माध्यमांतून मदत करतात. महाराष्ट्रातला तरुण शेतीकडे आणि कृषी पर्यटन उद्योगांकडे नव्या उमेदीने वळला तर तो शेतकऱ्यांसाठी पर्यायाने महाराष्ट्रासाठी उत्कर्षाचा क्षण असेल. महाराष्ट्रभर कृषी पर्यटन उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करणा हा पुस्तक आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 60 पेक्षा अधिक विविध साहित्य प्रकारातले पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती प्रकाशक आणि ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष घनश्याम पाटील यांनी सांगितले.
*देशाची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तकाचे प्रकाशन होणे एक अभिमानास्पद आहे. कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांसाठी कौतुकाची गोष्ट आहे. या पुस्तकातील 15 कृषी पर्यटन केंद्राची यशोगाथा सांस्कृतिक राजधानी पुणे ते देशाची राजधानी दिल्ली पर्यंत मराठी वाचकांना कृषी पर्यटन यशोगाथ वाचायला मिळणार आहे. याचा मनस्वी आनंद आहे.*
लेखक गणेश चप्पलवार
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
PUNE24 NEWS – JAYSHREE DIMBLE
9623968990/9689934162