*पुण्याचा कुस्ती इतिहास श्री छत्रपती शिवाजी कुस्ती स्टेडियम धुळखात पडिक अवस्थेत*
*(कीर्तिमन्त मल्लाचा सहवास असलेल्या कुस्ती इतिहासाची नवनिर्माण व्ह्यायला पाहिजे कुस्ती मल्लविद्या महासंघाची मागणी)*
आ. नामदेवराव मते हे पुणे राष्ट्रिय तालीम संघाचे अध्यक्ष असताना ना शरदचंद्र पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली श्री छत्रपती शिवाजी स्टेडिमचा नामकरण सोहळा ना यशवतराव चव्हाण यांच्या हस्ते दि 28 डिसेंबर 1974 रोजी संपन्न झाला केंद्र सरकार महाराष्ट्र शासन पुणे मनपा यांच्या बरोबर अनेक उद्योगपतिनी त्याकाळी निधी देऊन महारष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पुण्यामधे छत्रपती शिवाजी कुस्ती स्टेडियम उभारले स्वातंत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र चैम्पियन स्पर्धा 1953 साली झाली त्यानंतर मामासाहेब मोहोळ यानी कुस्तीगीर परिषदेची स्थापना करुण इ स 1961 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु केली सहा सात दशकामधे राज्यात या व्यतिरिक्त अनेक जिल्ह्यात लहान गटापासून मोठ्या पर्यन्त कुस्ती मैदाने व्ह्यायची*
पुण्यात कुस्तीचा इतिहास कोल्हापुर सारखा हा मोठा आहे पुण्याच्या पेठांमधे कुस्ती प्रशिक्षणसाठी अनेक बलाढ्य तालमी आणि तूफानी पैलवानांचा कुस्तीत दबदबा होता पुण्यामधील कुस्ती टिकावी वाढवी यासाठी महाराष्ट्रात नामवंत मल्ल वस्ताद कुस्तीशॉकिनाच्या मागनीमुळे शासनाने पुण्याच्या कसबा पेठेत छत्रपति शिवाजी स्डेडियम करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्राचाया अनेक तालमीमधल्या गिरनीकामगार शेतकरी तरुण कुस्तीगिराच्या महाराष्ट्र केसरी बरोबरच शिवाजी स्डेडियामला आपली कुस्ती आसावी आणि आपन ते मैदान मारून कुस्ती जिंकावी हे स्वप्न मनात बाळगुन असायची*
आता बऱ्याच वर्षात स्टेडियमला मैदान झाले नाही नव्याने पैलवानकी करणाऱ्या कुस्तीगीराना चंदूभाई शिवरामवाले किंवा श्री शिवाजी स्टेडियम हे माहितच नाहित सध्या वर्षातून एकदा शहराची चाचणी स्पर्धा होते त्या वेळेस तात्पुरत्या स्वरुपाची सफाई केली जाते संघाचा नवा बोर्ड लावला जातो त्यादिवसाची स्पर्धा झाली की मात्र त्याठिकाणी वर्षभर कोणीही फिरकत नाही स्टेडियमची मात्र उदास दयनीय अवस्था होऊन पडिक झाले आहे बऱ्याच ठिकाणी सरक्षण भिंती आतील भिंतीची पडझड झाली आहे बाहेर व आतमधेदेखील छोट्या छोट्या स्वरुपाचे अतिक्रमण कचऱ्याचे ढीग झाले आहेत जुन्या झाडांची अवस्था बेकार आहे स्टेडियामला सध्या नावाचा फलक देखील नाही ही अंत्यत शोकांतिका आहे पुणे पालिका कडून पे पार्किंग सध्या चालू असून सुरक्षारक्षक वर्दी न घालता आपल्या वेयक्तिक कामात व्यस्त असतात आजूबाजूच्या वस्तीभागातील तरुणापासून वयस्कर लोक जुगार खेळत पान गुटखा खाऊँन स्टेडियामच्या आवारात फिरत असतात*
महाराष्ट्रामधील महाराष्ट्रकेसरी हिंदकेसरी राष्ट्रिय आंतररष्ट्रीय स्तरावरील नामवंत पैलवानांचा सहवास असलेला पुण्याचा कुस्ती इतिहास दमखा श्वास घेत सध्या पडिक म्हणून जगत आहे त्याला पुणे महानगर पालिका महाराष्ट्र शासन जिवंत पणा अनतील ही कुस्ती शौकीनाना आशा आहे*
मागणी
1)महानगर पालिका व शासनाने तात्पुरते दूरुस्त न करता नव्याने स्टेडियला आंतरराष्ट्रिय दर्जात्मक काम करावे
2)स्टेडियमला “श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम” हे नाव द्याव
3)कुस्तीला राजाश्रय देणाऱ्या महाराष्ट्रातील मंडळींनी स्टेडियामला इतिहासाची आठवण जागी करण्यासाठी एकदा चंदूभाई वाले शिवराम वाले कुस्ती मैदान घ्यावे
4) स्टेडियमला कुस्तीगीर व शौकीनासाठी योग्यत्या सोईसुविधा देऊन हनुमान मंदिर स्टेज बैठक व्यवस्था पार्किंग लाईट पाणी माती मॅट सरक्षक भिंती तत्पर सुरक्षारक्षक सफाई कर्मचारी झाडांचे संगोपन छोट्या मोठ्या स्वरुपातील आतील बाहेरील अतिक्रमण या गोष्टी योग्यरित्या असाव्यात
5) खेळाडूसाठी महापौर कुस्ती स्पर्धा झाली नाही त्यामुळे मनपा ने महापौर कुस्ती स्पर्धे ऐवजी मनपा चषक स्पर्धा घ्यावी
6) नव्या पिढीसाठी जुन्या काळातील स्टेडियामला झालेल्या कुस्त्याचा नामवंत मल्लाच संग्रहालय असाव
7) कसबा पेठ पोलिसांनी स्टेडियमच्या आत जुगार व दारू गुटखा खात बसणाऱ्या चा बंदोबस्त करावा
पै निकुंज दत्तात्रय उभे
कुस्ती मल्लविद्या महासंघ पुणे शहर
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
PUNE24 NEWS – 9623968990/9689934162