आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे येथे आयोजित गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे येथे आयोजित गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, हेमंत रासणे उपस्थित होते.

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करुन देण्याकरिता मेटा संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. आगामी ६ महिन्यात व्हॉटस्ॲप गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुमारे ५०० सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

पुणे येथे गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया यांच्यावतीने सहकारी गृहनिर्माण संस्थेला ऑनलाईन प्रशिक्षण देण्याकरीता ई-कोर्स, निवडणूक विषयक ई-कोर्स, ई-कॅप्लायएन्स ऑफ हॉऊसिंग लॉज याप्रणाली लोकार्पण तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था मार्गदर्शक पुस्तिका, सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंटकरीता मार्गदर्शकपुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. 

यावेळी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, वरिष्ठ उपाध्यक्ष सीताराम राणे, उपाध्यक्ष प्रकाश दरेकर आदी उपस्थित होते.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment