*मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर येथे प्रगत मल्टिस्पेशॅलिटी सर्जिकल रोबोटिक सिस्टमचे उद्घाटन*

*मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर येथे प्रगत मल्टिस्पेशॅलिटी सर्जिकल रोबोटिक सिस्टमचे उद्घाटन*

*पुण्याच्या पश्चिम विभागातील सर्जिकल एक्सेलेन्स मध्ये नवीन युगाची सुरुवात*

*पुणे, २९ एप्रिल २०२५-* मल्टिस्पेशॅलिटी सर्जरीज मध्ये दि एसएसआय मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टम या अत्याधुनिक अशा पध्दतींची सुरुवात प्रथमच बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल मध्ये करण्यात आली असून यामुळे रुग्ण सेवा विभागात आणखी एक आधुनिक पध्दतीची सुरुवात झाली आहे. या नवीन पध्दती मुळे हॉस्पिटल कडून आता अगदी अचूक आणि मिनिमली इन्व्हेझिव्ह शस्त्रक्रिया करता येणार आहेत. यामुळे कार्डिॲक थोरॅसिस, ऑन्कोलॉजी, युरोलॉजी, गायनॅकोलॉजी आणि जनरल सर्जरी क्षेत्रात नवीन क्रांती झाली आहे.

मणिपाल हॉस्पिटल बाणेर ने आता हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून यामुळे रोबोटिक असिस्टेड सर्जरी मधील नवीन मार्ग खुला झाला आहे. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची त्यांची वचनबध्दता अधोरेखित होऊन रुग्णांच्या सेवेकरता असलेली रुग्णकेंद्रित सेवा देण्याची वचनबध्दता सुध्दा अधोरेखित झाली आहे.

यावेळी बोलतांना पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल च्या सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि सर्जरी चे विभाग प्रमुख आणि कन्सल्टंट डॉ. अमीत पारसनीस यांनी सांगितले “ रोबोटिक असिस्टेड सर्जरी मुळे अनेक लाभ होतात, यांतील महत्त्वाचा लाभ म्हणजे अजोड अचूकता आणि सटीक पणे सर्जरी करता येते. अगदी छोट्या जखमेतून सर्जरी करता येते यामुळे सर्जन पूर्ण नियंत्रण मिळवून अतिशय नियंत्रितपणे काम करु शकतात, त्यामुळे चांगले निष्कर्श मिळतात. रोबोच्या आधुनिक ३डी क्षमतांमुळे परंपरागत लापारोस्कोपी च्या तुलनेत सर्जन अकि चांगल्या प्रकारे झुम करु शकत असल्याने पेशींची हाताळणी योग्य पध्दतीने करु शकतात. रोबोटिक सिस्टम मुळे सर्जनला सुधारीत रिझॉल्युशन मिळते, चांगल्या प्रकारे काम करता येते ज्यामुळे अधिक चांगली सर्जरी होऊन रुग्णाला आराम मिळतो.”   

या सुरुवाती विषयी बोलतानां पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल चे कन्सल्टंट युरोलॉजी डॉ. आनंद धारसकर यांनी सांगितले “ डीप पेल्व्हिक सर्जरीज किंवा इंट्रिकेंट किडनीच्या उपचारांमध्ये जी अचूकता गरजेची असते ती यात प्राप्त होते आणि त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर कमी त्रास होतो. विशेष करुन अतिशय जटील अशा सर्जरीज मध्ये अगदी अचूकता मिळते, कमी जखम आणि वेगाने बरे होता येत असल्याने चांगले निष्कर्श प्राप्त होतात. रोबोटिक्स मुळे किडनी ट्रान्सप्लान्टेशन मध्ये मोठा लाभ होऊ लागला आहे.”

पुण्यातील मणिपाल हॉस्पिटल चे क्लस्टर डायरेक्टर श्री आनंद मोटे यांनी सांगितले “ मणिपाल हॉस्पिटल्स मध्ये आमचे प्रमुख लक्ष्य म्हणजे रुग्णांना जगभरांत उपलब्ध असलेले अत्याधुनिक आरोग्य सेवांमधील नाविन्य उपलब्ध करुन देणे. या वचनबध्दते मुळेच आम्ही एसएसआय मंत्रा रोबोटिक सिस्टम सुरु करु शकलो. या मंचाचे डिझाईन हे सर्जन्सना अधिक नियंत्रण मिळून किमान जटीलतेने काम करणे शक्य होईल. यामधील अर्गोनॉमिक कंट्रोल्स, ३डी ४ के इमेजिंग आणि जागतिक सुरक्षा पध्दतींमुळे आता सर्जिकल युगात नवीन क्रांती घडणार आहे.”

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment