बनावट वयाच्या प्रमाणपत्राद्वारे लहान पैलवानाच्या कुस्ती स्पर्धेत मोठ्या मुलांचा सहभाग कधी थांबणार ?
शालेय व संघटनामार्फत घेण्यात येणाऱ्या कुस्ती क्रीड़ा स्पर्धांमधे वय कमी करुन सहभागी होणाऱ्या विधार्थी खेळाडू विषयी तक्रारीबाबत …
शालेय विभागामार्फत तसेच महाराष्ट्रातील संघटनामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या किंवा निरीक्षणाखाली पार पडणाऱ्या शालेय कुस्ती क्रीड़ा व संघटना माध्यमातून घेण्यात येणाऱ्या वय वर्ष 14/15/17 लहान वयोगट मर्यादित कुस्ती स्पर्धांमधे काही विधार्थी खोटे वय दाखवून स्पर्धेमधे सहभाग घेत आहेत.
महाराष्ट्रात पुण्यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय वय वर्ष 14/15/17 वयोगटातील विद्यार्थी कुस्तीगिरांसाठी अनेक कुस्ती स्पर्धेचे आयोजन होत असते यामधे निदर्शनास येत आहे की काही विद्यार्थी त्यांचे खरे वय लपवून कमी वय दाखवणारे बनावट किंवा चुकीचे प्रमाणपत्र वापरून स्पर्धेमधे सहभाग घेत आहेत खेळत आहेत.
अशा विद्यार्थ्यांवर कुस्ती स्पर्धेमधे आक्षेप घेण्यात आला पाहिजे, त्यांच्याकडे खोट्या वयाचे मूळ जन्मदाखले, आधारकार्ड, शाळेचे दाखले तसेच इतर कागदपत्रे व प्रमाणपत्र हे दाखवण्यात येतात ते सहजपणे तपासले जाऊन यातून सुटका करतात, यासोबतच असे देखील आढळून आले आहे की काही विधार्थी पुढील वर्गातून शाळा बदलून दुसऱ्या शाळेमधे जाऊन पुन्हा मागील वर्गात चुकीच्या पद्धतीने प्रवेश घेतात. त्यांच्या अशा गैरकृतीला त्यांचे पालक, प्रशिक्षक व सोबतच काही शाळा तर सहभागी नाहीत ना असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
असे प्रकार केवळ स्पर्धेच्या नैतिकतेवर तर बाधा आणतातच परंतु खऱ्या सुपात्र व योग्य वयाच्या विद्यार्थ्यांच्या हक्कावर देखील अन्याय होण्यास जबाबदार असल्याचे दिसून येते. असे गैरप्रकार पूर्णपणे संपुष्टात येण्यासाठी शालेय व संघटनांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या अशा कुस्ती स्पर्धांमध्ये आपण कटाक्षाने लक्ष्य केंद्रित करण्यात यावे. त्याचबरोबर संशयित तसेच जे प्रामाणिक खेळाडू असतील त्यांच्या पालकांकडून तक्रार करण्यात येणाऱ्या बनावट वय कागदपत्रे बनवणाऱ्या डमी खेळाडूंची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी यासोबतच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भविष्यात याबाबत कड़क स्वरुपाची नियमावली आपल्यामार्फत करण्यात यावी.
प्रशासनाने कुस्ती असोत किंवा अन्य स्पर्धा, परंतु अशा प्रकारच्या गंभीर विषयांची तातडीने दखल घेऊन त्वरित कारवाई करून योग्य तो न्याय मिळवून देणे अपेक्षित, कुस्ती क्रीड़ा शौकिनांकडून कळकळीची विनंती
पै निकुंज दत्तात्रय उभे (nis कुस्ती कोच)
कुस्ती मल्लविद्या पुणे प्रवक्ता : *प्रत्येक मैदानी क्रीड़ा प्रकारात खेळाडूच्या आयुष्याचा प्रवास हा शालेय व संघटनांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या कुमार (ज्युनियर) स्पर्धेत सुरु होत असतानाच मोठ्या वयाचे खेळाडू हे त्याला त्या सामन्यात पराभूत नव्हे तर त्या लहान पैलवानाच्या कुस्ती क्रीड़ा जीवनाला चितपट करीत असतात, अशा कृत्यांमुळे तो कुस्तीगिरचाच नाही तर कुस्तीचादेखील पराभव होत असतो, दुर्देवाने ही बाब फ़क्त आपल्या राज्यापूर्तीच मर्यादित नसून संपूर्ण देशाची आहे, यामुळे नवोदित कुस्तीगिरांना आपले पालक कुस्ती क्रीड़ा प्रकारापासुन लांब करीत आहेत* तेव्हा असे होऊ नये यासाठी याकडे गांभीर्याने पाहण्यात यावे.
धन्यवाद🙏