सारनाथ बुद्ध विहार कृती समिती व्दारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याच बरोबर क्रियेटीव्हीटी क्लब तर्फे कार्यशाळा आयोजन

आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी लक्ष्मीनगर बुद्धविहार डहाणूकर कॉलनी प्रथम एज्युकेशन अंतर्गत क्रियेटीव्हीटी क्लब तर्फे कार्यशाळा घेण्यात आलीं…

यामध्ये इयत्ता 9वी ,10वी ,11 वी ,12 वी मधील  चॅम्पियन विद्यार्थ्यांना टीचर म्हणून घेण्यात आले होते.

ज्या विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर आपल्याला या कार्यक्रमात उस्फूर्त प्रतिसाद दिला त्या विद्यार्थ्यांना क्रियेटीव्हीटी क्लब तर्फे सर्टिफिकेट व शालेय साहित्य देण्यात आले. 

विद्यार्थ्यांना जादुई फोटोग्राफी शिकविण्यात आली, तसेच पोर्टल समजावून सांगण्यात आले, पोर्टलवर जाऊन ऍक्टिव्हिटी कशा कराव्यात ते शिकविले गेले.. 

या मध्ये गोसावी वस्ती. लक्ष्मीनगर वादरवस्ती,श्रमिक वसाहत यांच्या मुलांचा सहभाग होता.

हा कार्यक्रम सौ वंदना सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला, तसेच सौं निर्मला मेन कुदळे व मीना मोरे या ताई कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

या सर्व विभागातील काम सौं विमल प्रमोद खंडाळे या पहातात.कार्यक्रमाची सांगता मुलांना खाऊचे वाटप करून केली गेली.. 

११ ऑगस्ट २०२४ रोजी सारनाथ बुद्ध विहार कृती समिती लक्ष्मीनगर डहाणूकर कॉलनी कोथरूड, 

या ठिकाणी सकाळी 11 वाजता तायक्वनदो स्पर्धेमध्ये विविध ठिकाणी पाच गोल्ड मेडल मिळविलेला कु वेदांत विशाल डाकवे अभिनव विद्यालय इयत्ता दुसरी ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, याप्रसंगी प्राध्यापक बाबासाहेब जाधव, सुशील बोबडे, सुभाष नवगिरे, समाधान भगत,

भनते विठ्ठल आवटे, अमोल सोनवणे, सौ शुभांगी डाकवे, विनोद बचुटे साहेब, सौ स्वाती पोळ, व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन श्री राजाभाऊ गायकवाड कार्याध्यक्ष सारनाथ बुद्ध विहार कृती समिती यांनी केले होते.

 

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

Injection OR Surjari से बेहेतर ईलाज आयुर्वेद

  *केळी* 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

Spread the love
Read More »