* लहानग्या जैनम-जिविका जैन ने विविध शाळांमध्ये ५० दिवसांत घेतले १२० कार्यक्रम *
पिंपरी -चिंचवड : दुबईत राहणाऱ्या जैन कुटुंबातील 10 आणि 12 वर्षांच्या जैनम आणि जिविका या दोन लहानग्या बहीण-भावंडाने त्यांच्या पालकांच्या सांगण्यावरून भारतात 50 दिवसांत 100 ज्ञानदानाचे कार्यक्रम करण्याचा संकल्प केला होता. जैन धर्माची तत्त्वे तसेच वैज्ञानिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याची त्यांची जोरदार संकल्पपूर्ती झाली, कारण त्यांनी केवळ 50 दिवसांत 120 कार्यक्रम आयोजित आपला हा ज्ञानदानाचा यज्ञ यशस्वी संपन्न केला. याच उपक्रमा अंतर्गत त्यांचा १२१ वा कार्यक्रम गुरुवार २९ आॅगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शाळा-काॅलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात जैनम आणि जिविका ने विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणाऱे गुण अंगी कसे बाणवावे, याविषयी मार्गदर्शन दिले.
आपल्या मुलांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना ममता धीरज जैन म्हणाल्या की, आपल्या या आगळ्यावेगळ्या ज्ञानयज्ञाची संकल्पपूर्ती करण्यासाठी दुबईहून भारतात आल्यानंतर जैनम व जिविका यांनी महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, बीड अशा विविध शहरातील शाळांना भेटी दिल्या आणि आतापर्यंत ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची कार्यसिद्धी केली.
ममता जैन यांनी पुढे सांगितले की, जैनम आणि जिविका यांनी सुरवातीला ५० दिवसांमध्ये ५० आॅडियो बुक ऐकल्या. त्या माध्यमातून त्यांना प्रचंड असे ज्ञान प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या मिळालेल्या या ज्ञानाचा उपयोग आपल्या भारत देशातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. गेल्या ५० दिवसांमध्ये या दोघांनी तब्बल १२० हून अधिक कार्यक्रम घेतले.
जिविका हिने सांगितले की, आम्ही जे काही ज्ञान प्राप्त केले होते, ते आपल्या देशातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी आम्ही भारतात आलो आहोत. येथील विविध शाळा, त्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केले. अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले. त्यांच्यामुळेच आम्ही १२० पेक्षा जास्त कार्यक्रम करू शकलो. जैनम जैन म्हणाला की, आमच्या कार्यक्रमांना जो जबरदस्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आम्ही खरंच धन्य झालो. विज्ञान शिकवण्याच्या सोबतच आम्ही विद्यार्थ्यांना टीम वर्क, वेळेचे अचूक नियोजन, संभाषण कौशल्य, प्रेरणा, कोणत्याही निर्णयाला कशाप्रकारे पूर्णत्वास न्यावे, यासारख्या गोष्टी अत्यंत साध्यासोप्या शब्दांमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला.