हिरोजी इंदलकर प्रतिष्ठानने केले अभियंता दिनानिमित्त महत्वाच्या घोषणा समीर इंदलकर यांनी दिली माहिती…

हिरोजी इंदलकर प्रतिष्ठानने केले अभियंता दिनानिमित्त महत्वाच्या घोषणा समीर इंदलकर यांनी दिली माहिती…

पुणे :- महाराष्ट्राचे अराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांचे निष्ठावाण सेवक स्वराज्याचे बांधकाम प्रमुख सरदार हिरोजी इंदलकर ज्यांनी महाराजांच्या आज्ञेने लहाण मोठे मिळून सव्वादोनशे किल्ले व दुर्गराज रायगड बांधला त्याबाबत तसेच त्यांच्या स्वराज्य निष्ठेचा पुरावा म्हणून आजही किल्ले रायगडावर पाहायला मिळणारी ‘नेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर’ अशी मोडी भाषेत कोरलेली निष्ठेची पायरी या शिवकालीन गोष्टींच्या आठवणी चर्चा महाराष्ट्राच्या जना मनात अभियंता दिनाच्या निमित्ताने होत असतात.

हिरोजींबाबत तसेच त्यांच्या स्वराज्य निष्ठेबाबत जागर व्हावा, त्यांच्या बाबत अधिक माहिती मिळावी, स्मृती जागृत ठेवाव्या तसेच रायगडावरील ऐतीहासिक निष्ठेच्या पायरीची काळजीपुर्वक जपनुक व्हावी या मागणीतून शिवप्रेमींकडुन सातत्याने मागणी होऊ लागल्याने हिरोजी इंदलकर यांच्या वारसदारांनी सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठाणची स्थापणा केली असून शिवजयंतीला पुण्यात निघणारी सरदार घराण्यांची रथयात्रा तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात, बडोदा गुजरात, गोवा व ईतर ठिकाणच्या विविध कार्यक्रमात इंदलकरांच्या वंशजांचा सत्कार, सन्मान होत असतो.

सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य या मार्फत अभियंता दिवसाच्या मुहुर्तावर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंदलकरांच्या वंशज्यांनी हिरोजींच्या स्मृतीसंदर्भात आज पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये महत्वाची माहीती सादर केली आहे. 

त्यामधे प्रतिष्ठाण मार्फत यापुढे प्रतिवर्षी सर्वोत्कृष्ठ अभियंता पुरस्कार देणार तसेच रायगडावरील ऐतीहासिक निष्ठेची पायरीची जपणूक व्हावी म्हणून पायरीस’ वज्रलेप करावा तसेच त्याम काचेचे चौकट करावी जेणेकरून त्याचे संरक्षण होईल ह्याची मागणी पुरातत्व खात्यात करणार आहोत.

या दोन महत्वाच्या घोषणे बरोबरच प्रतिष्ठाणतर्फ राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रम खालील प्रमाणे त्यामधे जेजी कडेपठारावर वृक्षारोपण, मौजे कळंबे (सातारा) येथे भव्य रक्तदान शिविर तसेच पुणे पिंपरी चिंचवड गणेश मंडळांना मरदार हिरोजींचे स्मृतीचिन्ह व कॅलेंडर वाटप वगैरे, हिरोजींचे कार्य व स्वामीनिष्ठा यांचा प्रसार राज्यात तसेच देशात विविध उपक्रमाद्वारे करणार असल्याचा निर्धारही प्रतिष्ठाणचा वतीने करण्यात आला.

या प्रसंगी जेष्ठ इतिहासकार पांडुरंग तात्या बलकवडे, अतिरिक्त आयुक्त (पिंपरी चिंचवड मनपा) चंद्रकांत इंदलकर, पुणे जिल्हा नियोजन ममिनीचे अधिकारी किरण इंदलकर, अपर पो. अधिक्षक अशोक इंदलकर, मा. डि.वाय.एसपी. कृष्णाजी इंदलकर, तसेच सर्व सरदारघराण्याचे वंशज प्रतिनिधी राजाभाऊ पासलकर, अमित गायकवाड, रविंद्र कंक, बाळासाहेव सणस, गोरख करंजावणे इंद्रजित जेधे, मंगेशराव शिळमकर,प्रदिप मरळ तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास इंदलकर, सचिव- समीर इंदलकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

Injection OR Surjari से बेहेतर ईलाज आयुर्वेद

  *केळी* 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

Spread the love
Read More »