प्रामाणिकता सचोटी आणि निष्ठा हा स्वय: विकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार
श्री अजित गुलाबचंद यांचे विचार, निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न
पुणे: प्रामाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्वय: विकासाचा आणि नवतंत्रज्ञानाचा निर्माणाचा आधार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अपयशातून शिकण्याची गरज आहे. अपयाशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढून यश संपादन केले पाहिजे. विविध रणनीती आणि अनेक साधनांच्या माध्यमातून यशाची शिखर चढता येतात, म्हणून निराश न होता प्रामाणिकता राखत यश मिळवावे, असे प्रतिपादन निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एचसीसी लिमिटेडचे प्रमुख श्री अजित गुलाबचंद यांनी केले.
देशातील पहिली कंट्रक्शन मॅनेजमेंटमधील विद्यापीठ म्हणून ओळख असणारी निकमार विद्यापीठ पुणे यांचा पहिला दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अनिल कश्यप होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी, परीक्षा नियंत्रक डॉ. आदिनाथ दामले आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान पहिल्या दीक्षांत समारंभात एमबीए अडव्हान्स कंस्ट्रक्शन मॅनजमेंटचा विद्यार्थी लक्ष्मणन, एमबीए – एडवांस प्रोजेक्ट मैनेजमेंट, 2024चा विद्यार्थी पटगर रवींद्र नारायण, एमबीए – रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, 2024चा विद्यार्थी बोंडे कुणाल शांताराम, पीजीपी – क्वांटिटी सर्व्यिंग आणि कंट्रक्ट् मैनेजमेंट, 2024चा विद्यार्थी विपुल भालदे, पीजीपी – क्वांटिटी सर्व्यिंग आणि कंट्रक्ट् मैनेजमेंट, 2023 चा विद्यार्थी प्रजापती शिवप्रसाद बाराखुराम आणि पीजीपी – मैनेजमेंट ऑफ फैमिली ओन्ड् कंस्ट्रक्शन बिजनेस , २०२३चा विद्यार्थी चोवट्या श्रेनिल विजयभाई यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तसेच विविध विद्याशाखेतील 790 हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एचसीसी लिमिटेडचे प्रमुख श्री अजित गुलाबचंद म्हणाले की, अपयश ही यशाच्या जवळ घेऊन जाणारी आणि विविध बाबींचे मार्गदर्शन करणारी संस्था आहे. तुम्ही मजबूत निर्माणासाठी मेहनत घेऊन मानवता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे.
निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अनिल कश्यप म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा आणि त्यांच्या मेहनतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दिवस आहे. निकमार हा विचार 1983 मध्ये सुरू करण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत अनेक फळे या वृक्षाला आली आहे. संशोधन आणि नव तंत्रज्ञानाच्या शिकविण्यासाठी आणि शहरी विकासासाठीचे अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. ही आताची बॅच सगळ्यात महत्वाची आणि उच्च सॅन्डर्ड सेट करणारी आहे. आम्ही इंडस्ट्री रेडी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारताच्या विकासासाठी आणि विविध शहराच्या विकासासाठी आमचे विद्यार्थ्यी कटीबद्ध असतील. आम्ही निकमारच्या विद्यार्थ्यांकडे बदल घडविणारे आणि व्यावसायिक निर्माण करणारे हात म्हणून बघतो. उच्चस्तरावरील शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा आमचा मानस आहे.
कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी यांनी प्रस्तावना केली. त्या म्हणाल्या की विद्यापीठाने व्यवसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. आमचे धैय्य आहे, की स्किलड टेक्नो मैनेजर निर्माण करणे आणि त्याद्वारे व्यावसायिक निर्माण करणे हा आहे. शाश्वत विकासासाठी आतापर्यंत 227 संशोधन पेपर प्रकाशित केले आहे. परदेशातील विविध विद्यापीठांसोबत एमओयु केल्याने आमच्या विद्यार्थ्यांना परदेशात संधीची दारे उघडी झाली आहेत.