वाहन विमा नूतनीकरण आणि दंड वसुली प्रक्रिया संलग्न असाव्यात, राज्य शासनाकडे प्रस्ताव : मनोज पाटील यांची माहिती

वाहन विमा नूतनीकरण आणि दंड वसुली प्रक्रिया संलग्न असाव्यात राज्य शासनाकडे प्रस्ताव : मनोज पाटील यांची माहिती पुणे : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे बजाविण्यात येत असलेल्या दंडाच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. वाहनाच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना थकीत दंड वसुली होण्यासाठी या … Read more

Spread the love

फार्मसीच्या विविध क्षेत्रातील व एमपीएससी मधील यशवंताचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला

फार्मसीच्या विविध क्षेत्रातील व एमपीएससी मधील यशवंताचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला पुणे – फार्मसी समुदायाच्या यशाचा गौरव करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फार्मासिस्टचा पुण्यात भव्य महाराष्ट्र फार्मसी सन्मान सोहळा आयोजित केला.नागरी सेवा, कम्युनिटी फार्मसी, अकादमी आणि फार्मास्युटिकल उद्योगातील फार्मासिस्टना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमाने समाजात फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. हा … Read more

Spread the love

निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

प्रामाणिकता सचोटी आणि निष्ठा हा स्वय: विकासाचा आणि नवतंत्रज्ञान निर्माणाचा आधार श्री अजित गुलाबचंद यांचे विचार, निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न पुणे: प्रामाणिकता, सचोटी आणि निष्ठा हा स्वय: विकासाचा आणि नवतंत्रज्ञानाचा निर्माणाचा आधार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अपयशातून शिकण्याची गरज आहे. अपयाशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढून यश संपादन केले पाहिजे. विविध रणनीती … Read more

Spread the love

* एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २० व्या बॅचचा शुभारंभ * राजकारणात ‘सेवा परमोधर्म’ हे सूत्र लक्षात ठेवा पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान यांचे उदगार

पुणे – दिः १३ सप्टेंबर: ” ‘सेवा परमोधर्म’ हे सूत्र लक्षात ठेऊन राजकारणाच्या मैदानात उतरावे. जनतेच्या सेवेतूनच सामाजिक समस्या सोडविता येतात. जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल.” असे उद्गार पंजाब विधानसभेचे सभापती कुलतार सिंह संधवान यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’(एमपीजी) २० व्या बॅच च्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी राजस्थान विधानसभेचे माजी सभापती डॉ. सी.पी.जोशी व महाराष्ट्र विधानपरिषदे च्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड होते.

तसेच एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर व श्रीधर पब्बीशेट्टी हे उपस्थित होते.

यावेळी नॅशनल लॅजिलेटिव्ह कॉन्फरन्सच्या कॉपी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कुलतार सिंह संधवान म्हणाले,” समाजावर राजकारणाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. या क्षेत्रात येतांना मानव सेवा निःस्वार्थ भावनेने करावी. विचार आणि तलवाराने इतिहास लिहिला जातो. या देशात विविध धर्मांचे लोक असल्याने धर्म विरोधक गोष्टींना कधीही वाव देऊ नका. देशातील संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कायदे पास होतात त्यावर चर्चा विमर्श होत नाही. त्यामुळे असे आमदार आणि खासदार निर्माण व्हावे जे यावर बोलतील.”

डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या,” सरकार आणि प्रशासन समजावून घेणे, न्याय संस्था, शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक बदल, जनतेपासून ज्ञान मिळवा, ऐकण्याची सवय ठेवावी आणि लेजिलेटीव्ह टुल्स हे गुण अंगीकारावे. त्याच प्रमाणे राजकारणात उतरल्यावर संसदीय कामकाज, वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आणि जीवनासंदर्भातील अधिकार व आत्मविश्वास मिळतो. समाजाचे कल्याण साधण्यासाठी राजकारणात येऊन पॉलिसी लेवलवर बदल घडविता येतात. हा धागा सर्वांना जोडणार आहे. मानवधिकार संदर्भात माहिती घ्यावी. देशात आज ही जाती आणि वर्ण भेद आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी युवकांनी कार्य करावे. बदलत्या राजकारणामुळे खाजगी आणि सार्वजनीक जीवन राहिलेले नाही याचे भान ठेवावे.”

डॉ.सी.पी जोशी म्हणाल्या ” देशात औद्योगिक क्रांती नंतर सूचना क्रांती ही सर्वात मोठी होती. येथील उच्च शिक्षण जरी गुणवत्तापूर्ण असले तरी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत मोठी सुधारणेची अपेक्षा आहे. विषम समाजाला एकत्रित आणण्यासाठी राजकारणी मंडळींचे काम आहे. त्याच नुसार प्रत्येक युवकांमधील स्कीलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाचे ज्यांनी नेतृत्व केले ते सर्व बाहेर देशातून उच्च शिक्षण घेऊन आले होते. त्यामुळे आता राजकारण क्षेत्रात योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. देशात शिक्षित युवा वोटर असल्यास शिक्षक राजकारण येतील.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचे पालन करून मानव सेवेला महत्व दयावे. वसुधैव कुटुम्ब कमची संकल्पना राबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतांना पं. नेहरू यांनी सांगितले होते की मे देशाचा सेवक आहे. अशी भावना ठेऊन प्रत्येकाने कार्य करावे.”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,”राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. देशाची वाढती लोकसंख्या संदर्भात कोणतीही पार्टी विचार करीत नाही. अशा वेळेस राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची ब्यूरोक्रॉसी व स्थिती सुधरण्यास वेळ लागणार नाही. त्याच प्रमाणे देशातील कोणत्याही निवडणुकीच्या १ वर्षापूर्वी कोणतीही योजना घोषित करू नये. त्याच प्रमाणे हा पाठ्यक्रम देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेत सुरू करण्याची गरज आहे.”

यावेळी डॉ. आर.एम.चिटणीस यांनी विचार मांडले

डॉ. परिमल माया सुधाकर यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली.

यावेळी विद्यार्थी संस्कृती ढोलमा आणि ध्रुव सावजी यांनी विचार मांडले

प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

Spread the love

प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना ‘एमआयटी एडीटी’चे पंख *डॉ.सुजित धर्मपात्रे : स्पर्धा परिक्षांची तयारी करा पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्येच

 पुणे – सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) किंवा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसारख्या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणे, म्हणजे मायाजाळात फसण्यासारखे समजले जाते. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्पप्न उराशी बाळगुण, दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करतात. त्यात, पदवीपासूनच स्पर्धापरिक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो. … Read more

Spread the love

क्रिप्टो करंसीवरील चिंता:वजीर एक्सच्या सायबर हल्ल्याने आणला नवीन प्रश्न

क्रिप्टो करंसीवरील चिंता: वजीर एक्सच्या सायबर हल्ल्याने आणला  नवीन प्रश्न सरकार वारंवार म्हणते की इनोवेशन आणि सिक्युरिटी यांच्यामध्ये संतुलन आवश्यक आहे. पण क्रिप्टो करंसीच्या बाबतीत सिक्युरिटीच्या समस्या वाढत आहेत.  क्रिप्टो करंसी किती सुरक्षित आहे ?आणि पुढे काय करायला हवे, यावर एक रिपोर्ट नंतर बोलूया. वजीरएक्सवर सायबर हल्ला क्रिप्टो करंसी एक्सचेंज वजीरएक्सवर सायबर हल्ला झाला आहे. … Read more

Spread the love

कोथरूडमधील धोकादायक नाल्यांची इंडिया फ्रंट आघाडीच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर कोथरूड परिसरातील ओढे-नाले साफसफाई कामांची पाहणी आज इंडिया फ्रंट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली. प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व नाल्यांच्या साफसफाई कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.पाहणी दरम्यान कोथरूडमधील नालेसफाईची जवळपास ९०% कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. काहीच दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना अपूर्ण … Read more

Spread the love

खळबळजनक पर्वती भागात भाजपकडून पैसै वाटप ?

सहकारनगर पोलिस ठाण्यात धंगेकर यांचा ठिय्या आंदोलन,पर्वती भागात भाजपा कार्यकर्ते मतदारांना घरोघरी पैसे वाटप करत असल्याचा आरोप  धंगेकर यांनी केला व त्वरीत कारवाई ची मागणी धंगेकर यांनी केली पोलिस दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप ही धंगेकर यांनी केला. Spread the love

Spread the love

अंतर्गत बंडाळीचा भाजपला बसू शकतो फटका ?

यंदाची लढाई इतकी सोपी नाही आपल्याला वाटत असेल परंतु यंदाच्या लोकसभा मतदानामध्ये कमालीची फेरबदल बघायला मिळणार आहे त्यातल्या त्यात काही मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीची लढाई होणार आहे त्यातीलच एक भाग म्हणून पुणे ची लढाई ही अगदीच अटीतटीची लढाई होणार आहे गेल्या लोकसभा इलेक्शन मध्ये भाजपाला दमदार विजय मिळाला होता परंतु भाजपा समोर रवींद्र धंगेकर नावाचे एक … Read more

Spread the love