ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे डीलर्स जोडण्यासाठी संपूर्ण भारतभरात रोड शोचे आयोजन
महत्त्वाच्या शहरांमध्ये डीलर्सना जोडत, जेईएम ईव्ही व्यावसायिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील विस्तारासाठी सज्ज
पुणे – ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी (जेईएम) या ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाने, आपल्या डीलर नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर दोन महिन्यांच्या रोड शोचे आयोजन केले आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमाद्वारे, जेईएम भारतातील प्रमुख राज्यांवर लक्ष केंद्रित करून, व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विशिष्ट प्रादेशिक गरजांचा अभ्यास करणार आहे.
उद्दिष्ट : भारतभरात शाश्वत वाहतुकीत क्रांती घडवण्यासाठी, जेईएमच्या मिशनला बळ देणाऱ्या भागीदारांचे मजबूत जाळे तयार करणे.
लास्ट-माइल-डिलिव्हरीसाठी डिझाइन करण्यात आलेल्या तेज या कॉम्पॅक्ट कमर्शिअल ईव्हीच्या लाँचसाठी जेईएम सज्ज होत आहे. अशा वेळी ज्या बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रिक कमर्शिअल वाहनांसाठीची मागणी जास्त असेल तेथील डीलर्ससोबत संबंध जोडण्यासाठी व वाढविण्याला चालना देण्यासाठी हा रोड शो महत्त्वाचा आहे. तेजमध्ये 30kWh क्षमतेची बॅटरी आहे. त्यामुळे हे वाहन स्पर्धक वाहनांच्या तुलनेने 25% जास्त रेंज ऑफर करते. अनेक शहरांमध्ये या वाहनाचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू झालेला आहे आणि या वाहनाच्या उत्तम कामगिरीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशंसा करण्यात आली.
प्रत्येक राज्याला इलेक्ट्रिक कमर्शिअल वाहनांमुळे होणाऱ्या लाभाच्या क्षमतेच्या आधारे रोड शोमधील प्रत्येक राज्याची निवड करण्यात आली.
बेंगळुरू: स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानावर आधारित लॉजिस्टिक्ससाठी उत्तम, जिथे जलद, कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही लास्ट-माइल-डिलिव्हरी महत्त्वाचे आहे.
• पंजाब आणि हरियाणा: शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि शाश्वत वाहतूक उपायांसह शेतीच्या व्यवसायातील लॉजिस्टिक्सला पाठिंबा देणे.
• महाराष्ट्र (मुंबई, पुणे, नागपूर): शहरी ई-कॉमर्स आणि व्यापार क्षेत्रांसाठी योग्य, जिथे विश्वासार्ह आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीची गरज आहे.
• गुजरात (अहमदाबाद, सूरत): राज्यातील प्रगतीशील लघु-मध्यम उद्योगांसाठी विश्वासार्ह, किफायतशीर व्यावसायिक वाहन उपाय प्रदान करण्यात येईल.
• तामिळनाडू (चेन्नई, कोईम्बतूर): या वाढत्या इलेक्ट्रिक मोबिलिटी हबच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स गरजांशी सुसंगत.
• डीलर्सना या रोड शोमुळे एक विशेष संधी मिळते. या संधीचा लाभ घेऊन ते या वाढणाऱ्या बाजारपेठेत आपले वर्चस्व निर्माण करू शकतात. इलेक्ट्रिक कमर्शिअल वाहने ही भविष्यातील गोष्ट नाही, ही आता सद्यस्थिती आहे. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सवलती आणि वाढणारा इंधन खर्च यामुळे या वाहनांना चालना मिळाली आहे. या सर्व घटकांमुळे ईव्हीचा स्वीकार करणे व्यवहार्य आहेच, त्याचबरोबत ते गरजेचेही आहे. जेईएमसोबत भागीदारी करून या परिवर्तनाच्या परिस्थितीत डील आघाडीवर राहू शकतात आणि शाश्वत लॉजिस्टिक्समध्ये अग्रस्थान निर्माण करू शकतात.
• वाढती ईव्ही मागणी: भारताच्या वाढत्या ईव्ही बाजारात, डीलर्ससाठी पूरक असलेली धोरणे आणि वाढत्या इंधन किमतीचा लाभ घेऊन आपले स्थान भक्कम करू शकतात.
• उत्कृष्ट उत्पादन: जेईएमचे तेज वाहन उत्कृष्ट बॅटरी तंत्रज्ञानासह सर्वोत्तम रेंज आणि विश्वासार्हता प्रदान करते. त्यामुळे ऑपरेशनल डाऊनटाइम कमी होतो.
• सर्वसमावेशक परिसंस्था : जेईएम संपूर्ण परिसंस्था प्रदान करते, ज्यात वित्तपुरवठा, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि विक्री-पश्चात सपोर्टचा समावेश आहे.
• फ्लेक्झिबल ओनरशिप मॉडेल : वित्तपुरवठा आणि लीझचे पर्याय उपलब्ध असल्याने फ्लीट ऑपरेटर्स व ड्रायव्हर कम ओनरना (डीसीओ) ईव्हीचा पर्याय स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळते.
• भागीदारीवर आधारित यश : चार्जिंग, वित्तपुरवठा आणि लॉजिस्टिक्ससंदर्भात जेईएमच्या धोरणात्मक भागीदाऱ्यांमुळे इलेक्ट्रिक मोबिलिटी स्वीकारण्याचा प्रवास सुलभ होण्याची खात्री होते.
• “ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये एका निश्चित उद्दिष्टाने आम्ही इनोव्हेशनला चालना देत आहोत. भारताच्या वाहतूक परिसंस्थेला नव्याने घडविण्यात महत्त्वाचे योगदानकर्ते डीलर व समुदाय यांना सक्षम करणे हा आमचा हेतू आहे.”, असे जेईएमचे व्यवस्थापकीय संचालक विवेक लोहिया म्हणाले. “आमचा सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे. इलेक्ट्रिक वाहने पुरविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच ग्राहकानुरूप, शाश्वत उपाययोजना प्रदान करता याव्यात यासाठी डीलरना सक्षम करणे हाही आमचा उद्देश आहे. या रोड शोच्या माध्यमातून आम्ही एक असे नेटवर्क उभारत आहोत, जे स्थानिक पातळीवर लॉजिस्टिक्समध्ये परिवर्तन घडवून आणेल आणि हरित वाहतूक स्वीकारल्यानंतर व्यवसाय व ग्राहक या दोघांनाही त्याचा लाभ मिळेल, याची खात्री होईल.”
चार्जिंग पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा आणि लीझिंग क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांसोबत जेईएम भागीदारी करत आहे, जेणेकरून विविध क्षेत्रांमध्ये ईव्हीचा स्वीकार सुरळीतपणे होऊ शकेल. अजून काही धोरणात्मक भागीदाऱ्यांची प्रक्रिया सुरू असून भारतातील इलेक्ट्रिक कमर्शिअल वाहन कॅटेगरीमध्ये अग्रस्थानी राहण्यासाठी वातावरण निश्चित करत आहे.
About Jupiter Electric Mobility (JEM)
Jupiter Electric Mobility (JEM), the EV division of Jupiter Wagons Limited, was established with a future-forward vision for clean transportation. Focused on producing high-spec electric trucks and commercial vehicles, JEM is leading the charge in transforming the logistics space with products like the Tez e-LCV, which boasts cutting-edge powertrain and battery technology. In addition to developing superior electric vehicles, JEM is committed to building a robust ecosystem through its dealer network, offering solutions for financing, charging infrastructure, and demand for sustainable logistics. By breaking away from the traditional dealership model, JEM seeks to empower clients to thrive in the evolving electric mobility landscape while fostering a sustainable future. For more details, please visit Electric Vehicle | Jupiter (jupiterwagons.com).
About Jupiter Wagons Ltd. (JWL) (BSE: 533272; NSE: JWL)
Jupiter Wagons Limited (JWL) is a provider of comprehensive mobility solutions, with diverse offerings across Freight Wagons, Locomotives, Commercial Vehicles, ISO Marine Containers, and products such as Couplers, Draft Gears, Bogies, CMS Crossings, Brake Disc, Brake System, Wheels, Axles and Wheel sets. JWL has manufacturing facilities located in Kolkata, Jamshedpur, Indore, Jabalpur and Aurangabad with full backward integration to its foundry operations. The Group has established partnerships with leading global companies such as Tatravagonka a.s.(Slovakia), DAKO-CZ (Czech Republic), Kovis d.o.o. (Slovenia), Talleres Alegria s.a. (Spain).
With a rich legacy of over four decades, the Company has leveraged its deep technological capabilities and robust financial position to emerge as a one-stop shop for mobility solutions and reinforce its position as one of the fastest growing within the industry. Catering to industries such as Railways, Automobile, Transportation, Logistics, Construction Equipment, Municipalities, Healthcare, Energy, Mining and Infrastructure, the Company boasts a marquee client base including the Indian Railways, American Railroads, Indian Ministry of Defense, BEML, Alstom, Tata Motors, GE, Volvo Eicher Motors. For more details, please visit www.jupiterwagons.co