आशियाई मिनी गोल्फ स्पर्धा, *’एमआयटी एडीटी’च्या प्रांजली सुरदुसेला कांस्य*

*आशियाई मिनी गोल्फ स्पर्धा**’एमआयटी

एडीटी’च्या प्रांजली सुरदुसेला कांस्य*

*चांगाई (थायलंड)-* येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थिनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने सांघिक गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. 

या स्पर्धेत भारताच्या मुले व मुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी केली. मुलींच्या संघात प्रांजलीसह रिचा सिंग, ईशा फुलबांदे, इशिका हनवंत या खेळाडूंचा समावेश होता. प्रांजलीने नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धे त सुवर्णपदक, तर ३७ व्या राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्यपदकदेखील पटकाविले होते. 

प्रांजलीच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, स्कूल ऑफ बायो इंजिनिअरिंगच्या अधिष्ठाता डॉ. रेणू व्यास, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment

विज्ञापन बॉक्स

इतर बातम्या

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले. 

पुणे – येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसन्त अनंत गाडगीळ यांच वृद्धपकाळन निधन झाले.  त्यांच्या निधनावर प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व राहुल विश्वनाथ

Spread the love
Read More »