ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा
महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित “Culinary ID ” ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान
पुणे, भारत – मार्च २०२५ – भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हा नेहमीच एक महत्त्वाकांक्षी स्वप्न राहिले आहे. या दिशेने एक मोठी उपलब्धी म्हणून, महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित Culinary ID ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान करण्यात आली आहे. या घोषणेसाठी पुण्यातील ACOHI मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिशा ग्लोबल कन्सल्टिंग ( Disha Global Consultancy), एक नवउद्योजक शिक्षण सल्लागार संस्था, हॉस्पिटॅलिटी व हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना युरोप आणि इतर देशांमध्ये उच्च शिक्षण व करिअर संधी मिळवून देण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडवत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन व तज्ज्ञ सेवा प्रदान करते, ज्यामध्ये इटलीतील पूर्णतः वित्तपुरवठा केलेली शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया व करिअर नियोजन यांचा समावेश आहे.
“आमचे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांना इटली आणि युरोपमधील टॉप QS रँकिंग सार्वजनिक विद्यापीठांशी जोडणे आहे . आम्ही विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतो, जेणेकरून ते आपली क्षमता पूर्णपणे विकसित करू शकतील. आमच्या सर्व सेवांमध्ये उच्च दर्जा आणि प्रामाणिकतेचा अवलंब केला जातो. आम्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास परिवर्तनशील बनवण्यास वचनबद्ध आहोत, त्यांना उत्कृष्ट संधी आणि वैयक्तिक आधार देऊन जागतिक स्तरावर यश मिळवून देण्यास मदत करत आहोत,” असे दिशा ग्लोबल कन्सल्टंसीच्या संस्थापक, ज्युलिटा चौधरी यांनी सांगितले.
दिशा ग्लोबल कन्सल्टिंग ( Disha Global Consultancy) बद्दल
दिशा ग्लोबल कन्सल्टिंग ( Disha Global Consultancy) ही एक विशेष शिक्षण सल्लागार संस्था आहे, जी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करते आणि त्यांना समृद्ध शैक्षणिक अनुभव मिळवून देते. ६ देशांतील १२७ हून अधिक विद्यापीठांशी यशस्वी भागीदारी असलेल्या या संस्थेचा मुख्य भर इटलीतील पूर्णतः वित्तपुरवठा केलेल्या शिष्यवृत्ती योजनेवर आहे.
परदेशी शिक्षण संधींबाबत नेहमीच गोंधळ आणि माहितीचा अभाव राहिला आहे. अनेक विद्यार्थी हे जाणून नसतात की वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्णतः वित्तपुरवठा केलेल्या शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. अनेक सल्लागार या योजनांना प्रोत्साहन देत नाहीत, कारण त्यांना यामधून विशेष असा आर्थिक लाभ मिळत नाही, त्यामुळे महत्त्वाची माहिती दुर्लक्षित राहते.
“आम्ही अशा विद्यापीठे आणि एजन्सी शोधत आहोत, ज्या या शिष्यवृत्ती योजना प्रमोट करतात. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात हॉटेल मॅनेजमेंटच्या उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात,” असे ACOHI चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल यांनी सांगितले.
Culinary ID (पाककृती आयडी) म्हणजे काय?
Culinary ID हा ACOHI (एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) द्वारे सुरू करण्यात आलेला एक अद्वितीय ओळख प्रमाणपत्र कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत किंवा इच्छुक असलेल्या व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट्ससाठी लागू आहे.
ही ओळख प्रक्रिया संस्थेचा संपूर्ण तपशील तपासते, जसे की – पत्ता, सेवा क्षेत्र, संचालकांची पडताळणी आणि आतापर्यंतची कार्यक्षमता. जेव्हा एखादी संस्था या सर्व निकषांमध्ये पात्र ठरते, तेव्हा तिला एक विशिष्ट ओळख क्रमांक (Culinary ID) प्रदान केला जातो, जो एका वर्षासाठी वैध असतो. पुढील वर्षासाठी नूतनीकरण हे त्यांच्या सेवा आणि कार्यप्रदर्शनाच्या आधारे केले जाते.
पूर्वी, अनेक व्यक्ती व संस्था योग्य पार्श्वभूमी तपासणी शिवाय हॉस्पिटॅलिटी उद्योगात प्रवेश करत होत्या, त्यामुळे सेवा आणि दर्जा खालावत होता. मात्र, आता हा उद्योग अधिक शिस्तबद्ध, व्यस्थित आणि प्रमाणित स्वरूपात कार्यरत आहे.
“Culinary ID (पाककृती आयडी) हा आतिथ्य उद्योगात एक महत्त्वाचा ओळख चिन्ह आहे, जो भारत व आशियातील कोणत्याही व्यक्ती, सेवा, कॉर्पोरेट, ब्रँड किंवा संस्थेसाठी प्रतिष्ठेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो,” असे ACOHI कडून सांगण्यात आले.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
PUNE24 NEWS 9623968990/9689934162