पुणे शहरालगत असलेल्या मांजरी येथे भेसळयुक्त पनीर बनवणारा कारखाना सापडला

*युनिट ६ आणि अन्न व औषधं प्रशासन यांनी कारवाई करत तब्बल साडे अकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला*

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे शहरालगत असलेल्या मांजरीत भेसळयुक्त पनीर बनविण्यात येत होते याची माहिती पोलिसांना लागताच युनिट ६ आणि अन्न व औषधं प्रशासन यांनी कारवाई करत तब्बल साडे अकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.

आज गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अन्न व औषध प्रशासन यांना पत्रव्यवहार करून माणीकनगर, मांजरीखुर्द येथे एका शेतातील गोडावुन मध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या ठिकाणी यूनिट ६ कडील पथक व अन्न व औषध प्रशासन यांनी धाड टाकली असता तेथे ठिकाणी एकुण १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकुण ११,५६,६९०/- रू.चा मुद्देमाल सापडला आहे.

पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुणे तपासणीसाठी घेवुन उर्वरीत भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांचेकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळुन आल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेकडे तक्रार करावी.

ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालया कडील सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहूल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली

श्री. नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त (अन्न) पुणे, बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), पुणे श्रीमती अस्मिता गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे, सुप्रिया जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी, एल डब्ल्यु साळवे, नमुना सहायक, पुणे यांनी केली आहे.

भेसळयुक्त खाद्य पदार्थ कुठे तयार होतात यावर अन्न व औषधं प्रशासन याचेकडून सातत्याने लक्ष ठेवणे अपेक्षित असताना अशा प्रकारची कारवाई नियमित होताना दिसत नाही. या विभागाकडून भरारी कारवाई का होत नाही किंवा पुणे परिसरात भेसळ होत नाही हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.आजच्या कारवाई बद्दल पुणे पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

PUNE24 NEWS 9623968990/9689934162

Pune24 News
Author: Pune24 News

Spread the love

Leave a Comment