शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात मोगरा महोत्सव
पुणे : पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात आज (दि. 12) मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या माळांनी गाभारा सुशोभित करण्यात आला होता. असंख्य भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी शशिकांत सुतार, बापू गुडमेवार, पृथ्वीराज सुतार, डॉ. संदीप बुटाला, बेबीताई शिंदे उपस्थित होते.